<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ८५८ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज ५०६ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत १७१०५ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २९,(६५ RATI),भुसावळ २१,(६० RATI), अमळनेर ०१(०० RATI), चोपडा २७,(२२ RATI),पाचोरा १५, (१० RATI), भडगाव ०१,(२३ RATI), धरणगाव ००, (४० RATI),यावल ००, (१९ RATI), एरंडोल २२,(७७ RATI), जामनेर ०७,(२१९ RATI), जळगाव ग्रामीण ०१,(२८ RATI), रावेर ०३, (१७ RATI), पारोळा ००,(५४ RATI), चाळीसगाव ०९,(५५ RATI), मुक्ताईनगर ००(२३ RATI), बोदवड ०४,(०४ RATI), इतर जिल्ह्यातील-०१, (०१ RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २४३८५ इतकी झाली आहे. आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ७६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ६५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.