<
दिनांक 26 रोजी संध्याकाळी 6.30 ला कोविड सेंटर रायसोनी कॉलेज येथे तुळजाई फाऊंडेशन आणि स्वराज्य गृप पथनाट्य गृप च्या वतीने कोविड रुग्णाचे मनोबल उंचवण्यासाठी पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.कोविड सेंटर मधे जाऊन बाधित रुग्णांचे पथनाट्याच्या माध्यमातून मनोरंजन करणारी ही जगातील पहिली टिम व पहिले पथनाट्य ठरले आहे.स्वराज्य पथनाट्य गृप यांनी महाराष्ट्रात ५०००च्या वर विविध सामाजिक समस्या ,आजार,रोग,जल,जमीन,जंगल अशा अनेक बाबींवर पथनाट्य सादर करुन समाजात मानाचे स्थान मिळवले आहे.
विनोद ,टिप्पणी ,अभिनय,सामाजिक जान भान,लोकभाषा यामुळे ही संपूर्ण टिमने जनमाणसाच्या मनात घर केले आहे.पथनाट्य सादरीकरण करतांना सोशल डिस्टन्स ठेवून योग्य खबरदारी घेतली गेली.स्वराज्य पथनाट्य गृपचे विनोद पाटील,विकास वाघ,करण माळकर ,निलेश लोहार ,महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक गीतकार चंद्रकांत इंगळे यांनी सादरीकरण करत रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. सादरीकरणावेळी तुळजाई फाऊंडेशन अध्यक्ष भुषण लाडवंजारी व अरविंद देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.रायसोनी काॕलेजातील जी.एम.फाऊंडेशनच्या कोविड सेंटर येथे झालेल्या पथनाट्याला जी.एम.फाऊंडेशनचे अमित देशमुख ,कोरोना योद्धे डाॕक्टर,परिचारीका,फाऊंडेशनचे कार्यकर्ते ,तुळजाई बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भुषण लाडवंजारी,किरण लाडवंजारी लोकसंवाद बहुउद्देशीय संस्थेचे शिरीष तायडे,तसेच कोरोनाशी लढा देणारे कोरोना बाधित बांधव उपस्थित होते.पथनाट्य संयोजनासाठी प्रा.विजय लोहार यांचे सहकार्य लाभले.सामाजिक जाणीवेपोटी असे धाडस करत सादरीकरणाबद्दल सामाजिक स्तरावरुन या टीमचे कौतुक होत आहे.