<
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
शाखा धूळे दिं 26-2020 रोजी अ.भा.वि.परिषदेचे कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता भेटेस नकार दिल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहना समोर घोषणा बाजी केल्या असून पा.मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार अ.भा.वि.प च्या कार्यकर्ते वर हजर असलेल्या पोलिसांनी अमानुष पणे मारहाण केली.
या मारहाणीचा भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन त्वरीत राजीनामा देऊन संबंधित पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात यावे अशी मांगणी भारतीय जनता पार्टीने करून जामनेर तहसीलदार अरूण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.
या ठिकाणी निवेदनाच्या वेळेस ता.अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर.नपा गटनेते प्रशांत भोंडे.नगर सेवक मंहेद्र बाविस्कर.जामनेर तालुका शिक्षण संस्थेंचे सचिव जितेंद्र पाटील.रविंद्र झाल्टे.नितीन झाल्टे.दिपक पाटील.दिपक तायड़े.संतोष बारी.नगर सेवक आतिष झाल्टे.बाबुराव हिवराळे.सुहास पाटील.कैलास नरवाडे सह आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.