<
जामनेर प्रतिनिधी :-अभिमान झाल्टे
सध्या देशावर कोरोना सारख्या महामारीचे संकट पसरलेले असून पोलिस, डॉक्टर,आरोग्य सेवा आपल्या जिवाची पर्वा न करता नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत असून कोरोना अशा महा भंयकर बिमारीशी लढा देऊन आपले कर्तव्य पार पाडत आहे.
आपल्या घरातील सदस्यांची काळजी न करता दिवस असो या रात्र चोवीस तास कोरोनाला तोड देऊन एक उत्कृष्ट आदर्श घडवित आहे. म्हणून अशा प्रकारे जामनेर शहरातील पोलिस बांधव , डाॅक्टर यांना संबोधित करून राजपूत करनी सेने तर्फे कोरोना योद्धाना सन्मानित केले व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
त्याच प्रमाणे आदरणीय सुखदेव सिंगजी गोगामेडी यांच्या उपस्थितीत शहरातील समाजसेवक रतन सिंग राणा(परदेशी) यांची जामनेर तालुका बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच आरोग्य सेवक रुग्णसेवेचे काम इमानदारीने पार पाडणारे जालमसिंग राजपुत यांची उपाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.
जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे , होमगार्ड संघटनेचे समादेशक साहेब भगवान पाटील ,पोलीस कर्मचारी,तालुका वैदयकीय अधिकारी डॉ .विनय सोनवणे, आरोग्य सेवक यांना कोरोना योध्दा म्हणुन गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित राष्ट्रीय राजपुत करनी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विलास सिंग राजपुत, तालुकाध्यक्ष रतन सिंग परदेशी, उपाध्यक्ष जालमसिंग राजपुत, महेंद्रसिंग परदेशी, चेतन राजपुत, शुभम राजपुत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.