<
जळगाव (प्रतिनिधी)- यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक व्हावा व यातूनच पर्यावरण रक्षकांच्या कार्याची दखल घेतली जावी या उद्देशाने जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने “शाडू मातीचा माझा बाप्पा” हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सहभागी व्यक्तीने स्वत: घरी शाडू मातीपासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक बाप्पाचा फोटो युवा परिषदेकडे पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ५१२ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, युवती, शिक्षक तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.उपक्रमाअंती सर्व सहभागी स्पर्धकांना युवा परिषदेतर्फे आकर्षक डिजीटल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उपक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर, प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्षा प्रतिक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा महासचिव दिव्या भोसले, जिल्हा सचिव आकाश धनगर, अविनाश जावळे, सागर महाजन, आकाश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. दरम्यान, युवा परिषदेच्या वतीने अशा प्रकारे पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रम राबविल्याने जिल्ह्याभरात युवा परिषदेचे कौतुक होत आहे.