<
जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना आजारामुळे अनेक क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण देण्याची वेळ आहे. हे आव्हान पेलताना शिक्षक विद्यार्थी व पालक यांची होणारी तारेवरची कसरत यातून परस्परांच्या सुप्त संघर्षातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जळगाव चाईल्ड लाईनने वेबिनार मालिकांचे आयोजन केले आहे. या मालिकेतील दुसरा भाग शनिवार दि. 5 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केला आहे.
दुसऱ्या भागाचा विषय ऑनलाइन शिक्षण शिक्षकांचा समोरील आव्हाने असून प्रा. डॉ. बी एन. जगताप वक्ता म्हणून लाभले आहे. प्राध्यापक डॉक्टर जगताप हे आयआयटी मुंबई येथे प्रतिष्ठित वैज्ञानिक शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे . भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर रसायन शास्त्र समूहाचे संचालक होते . तसेच केंद्रीय विद्यालय आयोजित विविध प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या विषयाचे गांभीर्य व लाभलेल्या वक्ते त्यामुळे चुकवू नये असा वेबिनार असल्यामुळे शाळेतील सर्व शिक्षकाने सहभागी व्हावे असे आवाहन जळगाव चाईल्ड लाईन तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भानुदास येवलेकर मो. ९२२६८८२७३० यांचेशी संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.