<
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
पुणे येथील वृत्तवाहीनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळीच पाहीजे तशी वैद्यकीय मदत मिळाली नसल्याने अखेर त्यांचा मृत्यु झाला,
त्यामुळे घटनेची राज्यशासनाने गंभीर दखल घेऊन मयताच्या कुटुंबाला भरघोस सानुग्रह आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी तहसिलदार अरूण शेवाळे यांना जामनेर तालुका पत्रकार असोशि एशनतर्फे लेखी निवेदन देण्यात आले.
पुणे येथील मराठी वृत्तवाहीनीच्या (TV-9) एका उमद्या-तरूण पत्रकाराच्या जाण्याणे त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मात्र आता त्याच्या उदनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.
पत्रकारांना कूठल्याही प्रकारचे मानधन नाही म्हणून
शासनाकडुन मयताला कोवीड योध्दा घोषीत करून आर्थीक मदत मिळणे अपेक्षीत आहे.शिवाय यापुढील काळात कोरोनाबाधीत रूग्ण असलेल्या पत्रकारांसाठी कोवीड रूग्णालयात काही राखीव व्यवस्थे सारख्या उपाय योजनाही करण्यात याव्या आदी मागण्या निवेदनामधे नमुद करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतेवेळी पत्रकार असोशिएशनचे अध्यक्ष अमोल महाजन,सचिव पंढरी पाटील,खजीनदार सुनील नेरकर,उपाध्यक्ष भाईदास चव्हाण, जेष्ठपत्रकार प्रकाश सैतवाल,सुरेश महाजन, सुहास चौधरी,रवींद्र झाल्टे,प्रल्हाद सोनवणे, श्रीमती मिनल चौधरी, शांताराम झाल्टे, गजानन तायड़े, सुफीयान शेख, प्राजक्ता खरे,ईश्वर चौधरी,सैय्यद लियाकत,दादाराव वाघ,शांताराम जाधव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.