<
जळगांव(प्रतिनिधी)- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया ने जी फी जाहीर केली आहे. ती फी विद्यार्थ्यांना अमान्य आहे. विद्यार्थ्याचे अशी तक्रार आमच्या मासुच्या प्रतिनिधीकडे करण्यात आली होती. कोरोना चा महामारी मुळे देशा प्रचंड आर्थिक प्रश्नांना सामोरे जात आहे. अशा ह्या परिस्थिती मध्ये गरीब हातावर पोट भरणारे लोक शेतकरी वर्ग व मध्यम वर्गीय याची प्रचंड प्रमाणात ओढाताण होत आहे. या मध्ये ओपनची फीस ८०,६५० ओबीसी ची फी ४०,६५० इतकी आहे. या मध्ये जिमखाना फीस ३५०० Internet & Email facilities फी २५०० सारख्या फी विद्यार्थ्यांच्या माथी मारल्या जात आहेत. गव्हर्मेंट ची ग्रँड असून हि आपण आमच्या कडून कुठल्या प्रकारे development फी ३९,८५० मागत आहेत व हे कुठल्या नियमात बसते आपले कॉलेज हे आटोनोमस असून अनुदान मिळत असून हि आपण विद्यार्थ्यांन कडून कॉलेज चा मेंटेनन्स चा खर्च अकारण हे कुठल्या नियमात बसत हे जाहीर करावे. others fees हि २५०००रु घेतली जाते, ती हि कुठल्या कामा करीता व कशाचा आधारावर घेतली जाते हे हि जाहिर करावे विद्यार्थी हा इतकी फीस भरत आहेत तर ती तो का भरत आहे.व त्याचा उपयोग कशा साठी होतो हे जाणून घेणं त्याचा हक्क आहे. तरी आपण हे जाहीर करावे. हे सगळ्या वर विचार व्हावा व विद्याथ्यांची फी हि कमी करून त्यांचा आर्थिक बाबींचा विचार करावा अश्या आशयाचे निवेदन मासूच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कोकाटे यांना दिले. प्रसंगी मासूचे जळगाव विभाग प्रमुख ऍड.अभिजीत रंधे, राज्य संघटक अरुण चव्हाण, जळगाव विभाग सचिव चेतन चौधरी उपस्थित होते.