<
नेहरू युवा केंद्राचा स्पर्धेचा निकाल जाहीर : जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांची माहिती
जळगाव, दि.१० – जिल्हयातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘गंदगी मुक्त भारत’ या विषयावर ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून चित्रकला स्पर्धेत विद्या इंग्लिश मिडीयम शाळेची विद्यार्थिनी निकिता पाटील हिने तर निबंध स्पर्धेत जेएमव्हीपीएस शाळेच्या जया साळुंखे हिने प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी परिश्रम घेतले.
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत ४७ तर निबंध स्पर्धेत ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या परीक्षकांनी नुकतेच निकाल जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांच्याकडे सोपविला.
असा आहे निकाल
चित्रकला स्पर्धेत विद्या इंग्लिश मिडीयम स्कुलची निकिता देवराज पाटील प्रथम, भुसावळच्या रेल्वे स्कुलचा लक्ष उपरवाल द्वितीय तर पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची उत्कर्षा संतोष भडांगे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. निबंध स्पर्धेत जेएमव्हीपीएसची विद्यार्थिनी जया भास्कर साळुंखे, खुबचंद सागरमल विद्यालयाची तेजस्विनी बाविस्कर द्वितीय तर खडकेसीम येथील महेंद्रसिंग धरमसिंग माध्यमिक विद्यालयाची मानसी भरत पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
विजेते व स्पर्धकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा
चित्रकला आणि निबंध स्पर्धेत विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांनी नेहरू युवा केंद्राशी संपर्क साधवा. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यांनी देखील नेहरू युवा केंद्र कार्यालय, मानराज पार्क समोर, सुकृती रेसीडन्सीच्या मागील बाजूला याठिकाणी किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२५३१७१ यावर संपर्क साधावा असे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी कळविले आहे.