<
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री येथे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद दगडू चौधरी व ग्रामपंचायत सदस्य यांचे कार्यकाल संपल्यामुळे आज दि 14/09/2020 रोजी निरोप समारंभ करून त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तसेच ग्रामपंचायत च्या प्रशासक पदी फत्तेपुर केंद्राचे केंद्र प्रमुख मा. सुरेश साळी नियुक्त झाल्याने त्यांचाही पदग्रहण सोहळा माजी सरपंच दगडु हरी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आला असून यावेळी विश्वनाथ शिंदे मा.ग्रामपंचायत सदस्य, यांनी प्रास्ताविकातुन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या तसेच गावाच्या अनमोल सहकार्याने केलेल्या कामावर लक्ष केंद्रीत केले.
चिंचोली पिंप्री गावातील मावळते सरपंच मा. विनोदभाऊ चौधरी, नवनियुक्त प्रशासक मा. सुरेश साळी सर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार पोलीस पाटील यांच्या हस्ते झाला.
सर्व ग्रामस्थांच्या वतीने मावळते सरपंच विनोदभाऊ चौधरी यांना जाणता राजा छत्रपती शिवाजी महारांजाची राज्यभिषेक प्रतिमा भेंट स्वरूपात देण्यात आली त्याच बरोबर ग्रामपंचायत सदस्य प्रताप पाटील, प्रकाश गायकवाड, जगदीशअप्पा वाणी,श इन्सान तडवी,गणेश पाटील(ग्रामसेवक), दगडु जाधव(शिपाई), गजानन गायकवाड(पाणी पुरवठा),संदिप पाटील(रोजगार सेवक), डी.आर.शिंदे,देविदास सुरवाडे सर, वैद्य सर, तडवी सर, संदीप सोनार सर आदि पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ करण्यात आला
यावेळी गावाचे पोलीस पाटील मा. वसंतदादा लोखंडे , यांनी आपल्या मनोगतातून सरपंच विनोद दगडू चौधरी यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र राहुन संघटीत पणे सर्वांना सोबत घेत आपल्या पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडुन ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक करुन सरपंच यांच्या कार्याचे अनमोल शब्दाची रुपरेषा केली तर या पुढील काळात देखील नव नियुक्त प्रशासक मा. सुरेश साळी सर यांनी या चिंचोली पिंप्री गावाचा विकास करतील अशी अपेक्षा पोलिस पाटील यांनी नव निर्मित सरपंच सूरेश साळी सर यांच्या साठी व्यक्त केल्या तसेच पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या
यानंतर प्रशासक म्हणून जबाबदारी पार पाडतांना या पुढे असेच सहकार्य करण्याचे आवाहन देऊन गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नवनियुक्त प्रशासक मा.सुरेश साळी सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
मावळते सरपंच विनोद चौधरी यांना पाच वर्षे बिनविरोध निवडून दिले आणी अनेक शासनाच्या योजना राबवून प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले असतील त्यात काहींचे काम करतांना दिरंगाई झालेही नसतील अशा सर्वांची नम्रपणे माफी मागून सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
माजी सरपंच दगडु हरी चौधरी यांनी अध्यक्ष पद वरून पाच वर्षे ज्या पद्धतीने आपल्याला गावाचा विकास करून नावलौकीक सरपंचांनी काम पुढील काळात देखील व्हावे व यापुढील काळात निवडणुका बिनरोध करून परंपरा कायम ठेवण्याचे भावनिक आव्हान करीत जाहीर आभार मानले.