<
जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील युवक आणि युवतींसाठी दि 25 सप्टेंबर, 2020 रोजी ऑनलाईन यशस्वी करीअरसाठी आवश्यक गुण व कौशल्य मार्गदर्शन सत्राचे दुपारी 4 ते 5 या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे. सदर ऑन लाईन उपक्रमाची लिंक Google Meet ॲपवर शेडयुल केलेली आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.googel.com/uac-ppnm-kmr या लिंकवर जाऊन सत्रामध्ये सहभागी व्हावे.
ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात प्रा. यजुवेंद्र महाजन, दिपस्तंभ फाऊंडेशन, जळगांव उमेदवारांना यशस्वी करीअरसाठी आवश्यक गुण व कौशल्य व इतर अनुषंगिक बाबींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.