<
बोदवड :- शहरातील स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या इसमाच्या ताब्यातून 8लाख 40हजारा ची रोकड घेऊन भामटा अलगद पसार झाला. गुरुवारी सकाळी 11:30 ते 11:50 दरम्यान ही घटना घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील अमर डेअरी च्या मालकीची ही रक्कम असून काउंटर वर संबंधित इसम भरण्यासाठी आला असता त्यांनी पैसे असलेली रोकड एका खुर्चीवर ठेवली व दुसऱ्या पिशवीतून भरणा करण्यासाठी ची रक्कम देत असताना भामट्याने अलगद खुर्ची वरील पिशवी लांबवली. या पिशवीत 8लाख 40हजाराची रोकड होती दरम्यान सी सी टीव्ही त ही घटना कैद झाली असून चोरट्याने ब्लु शर्ट व ब्राऊन पॅन्ट घातल्याचे स्पष्ट झाले आहे.