<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आजपर्यंत बऱ्याच स्टॅच्यू तरी पोस्ट या रिक्त आहेत. त्यासाठी वारंवार विद्यापीठाकडे, मंत्री महोदयांकडे अर्ज त्याबाबत पुनर्निरीक्षण अर्ज हे दाखल करून देखील आजतागायत त्या नियुक्त्या केल्या गेलेल्या नाहीत. परंतु विद्यापीठ अधिनियम 2016 चे कलम 85 नुसार विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सहा महिन्यापर्यंत वरील तीनही जागा भरता येतात परंतु त्यानंतर महाराष्ट्र शासन यांची परवानगी घेऊन त्या जागेवर कायमस्वरूपी व्यक्ती यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. परंतु आमच्या कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अशी कुठलीही पद्धत अवलंबली जात नसून त्यासाठी आपणास या माध्यमातून करत आहोत. आमच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आजपर्यंत एका विशिष्ट विचारसरणीचे लोक यांची हुकूमशाही चालू होती व ती मोडीत काढण्यासाठी आपणास कळकळीची विनंती की सदर जागी लवकरात लवकर नवीन व्यक्तींची नेमणूक करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होणार नाही याची नोंद घ्यावी असे ई-मेल द्वारे निवेदन अँड. कुणाल पवार, भूषण भदाणे, कल्पिता पाटील, गणेश निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.