<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाच्या या महामारीत बऱ्याच कुटुंबाची आर्थिक ओढतान झालेली दिसून येत आहे. तसेच बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालकीची झालेली असून आपल्या पाल्याच्या ४० हजार ते ८० हजार फी देने ही खूप अवघड झालेले आहे म्हणून, स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी फी च्या बाबत मासूच्या प्रतिनिधींजवळ फोन द्वारे, ई-मेल द्वारे मेसेजस द्वारे चिंता व्यक्त करत आहे. याकरिता याची दखल घेउन आज महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे (मासु) उत्तर महाराष्ट्र प्रदेश जळगांव विभाग कमिटीचे प्रतिनिधी अँड.अभिजीत रंधे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना प्रत्यक्ष भेटुन निवेदन दिले. या निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की, ऑटोनोमस शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी मध्ये ४ टप्यात भरण्याची मुदत मिळावी आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क तात्काळ माफ करून विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना दिलासा द्यावा. प्रसंगी मासुचे जळगाव विभागप्रमुख अॅड.अभिजीत रंधे, जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन तसेच मासुचे चेतन चौधरी,अॅड. प्रल्हाद धुमाळे, इतर पदाधिकारी याप्रसंगी निवेदन देताना उपस्थित होते.