<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेकच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटी जळगाव विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणुन साजरा करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान यांनी २०१४ साली जाहीरनाम्यात देशाच्या तरुणांना २ कोटी रोजगार उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले परंतु आजची परिस्थिती फार दयनीय आहे नवीन रोजगार तर नाही परंतु लाखो तरुण आज केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगार झालेले आहेत. मासू या अराजकिय विद्यार्थी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिनाच्या दिवशीच राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करुन आपला विरोध प्रकट केला. परिस्थिती हाता बाहेर जाण्या अगोदर सावरली गेली पाहिजे नाहीतर जर देशाच्या तरुणांना रस्त्यावर आपल्या हक्काकरीता उतरायला वेळ लागणार नाही आणि याची सर्वस्वी जवाबदारी ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची असेल असा इशारा सुद्धा याप्रसंगी मासुकडून देण्यात आला. या आंदोलनात इतर पुरोगामी विद्यार्थी संघटनेने सुद्धा मासुला जाहीर पाठींबा देऊन सक्रीय सहभाग नोंदविला. आजच्या आंदोनलात मासुचे राज्य संघटक तथा उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अरुण चव्हाण जळगाव विभागप्रमुख अॅड.अभिजीत रंधे तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, अॅड.प्रल्हाद धुमले, चेतन चौधरी, जसवंत राजपूत व मासुचे इतर पदाधिकारी आणि सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते.