<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना महामारीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळा अद्यापही बंद ठेवण्यात आल्या आहे. या आणीबाणीच्या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत शिल्लक असणारे तांदूळ आणि डाळी यांचे वाटप समप्रमाणात करण्यात यावे आणि या कठीण प्रसंगी मुलांची मदत करावी. जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांना आहारा वाचुन उपाशी राहण्याची वेळ येऊ नये असे निर्देश राज्य सरकार आणि जिल्हा परिषद जळगांव यांनी दिले आहेत. शासनाच्या या आदेशाप्रमाणे तालुक्यातील आव्हाने शिवारातील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना तांदूळ आणि डाळीचे वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपसली. या करिता सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून सोशल डिस्टनसिंगचा वापर करीत सर्वाना १ मीटर अंतरावर उभे करीत चेहऱ्यावर मास्क अथवा रुमाल लावण्यास सांगण्यात आले. या उपक्रमास संस्थेचे तथा ग.स.सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याधापिका हर्षाली पाटील यांनी केले. उपक्रमास राहुल पाटील, जयश्री पाटील, मोहिनी सुरवाडे, दीपमाला बाविस्कर, दिशा पाटील, प्रज्ञा बाविस्कर, प्रसन्न, संदीप यांचे सहकार्य लाभले.