<
जळगांव(धर्मेश पालवे)-राज्यातील दोन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दोन महिन्यांपासून मिळालेले नसून ,जळगांव जिल्ह्यातील असंख्य आंगणावडी सेविकाच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वाढीव मानधनवाढीची अंमलबजावणी करावी, यासाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज रोजी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालय समोर जेलभरो आंदोलन केले.
शासनाच्या ३० जून २०१९च्या निर्णयानुसार ग्रामीण, आदिवासी केंद्रांना एक हजार रुपये, नागरी अंगणवाडी केंद्रांना ४ हजार, महानगरमधील अंगणवाडी केंद्रांना सहा हजार भाडे देण्यात यावे, पिण्याच्या पाण्यासाठी दहा हजार द्यावेत,अशा मागण्या घेऊन अंगणवाडी सेविका यांनी आज जिल्हा अधिकारी कार्यालायत निवेदन देऊन जेल जेलभरो आंदोलन केले .ज्यात किमान वेतन १८०००रुपये पाहिजे, असंघटित कर्मचाऱ्यांना कायम नोकराइतका पगार व सेवा शर्ती लागू करणे,६०वर्षे वरील श्रमिकांना ६०००रु पेंशन द्या, रेशन व्यवस्था मजबूत करण्या सह कामगार कायद्याची अमलबजावणी करण्याची मागणी नमूद आहे. वरील मागण्या धरत जोरदार घोषणा केल्या गेल्या,जवळ जवळ तीन हजार महिलांनी परिसर भरला होता, व पोलीस प्रशासनाच्या ही सहा गाड्या भरून जेलभरो करण्यासाठी कर्मचारी हजर होते. वरील मागण्या मान्य न झाल्यास आयटक चे सर्व समाविष्ट कर्मचारी ,पदाधिकारी, व अंगणवाडी सेविका, तथा मुख्यपदाधिकारी कर्मचारी या ही पुढे नाशिक येथे विभागीय मेळावा घेऊ अस जेलभरो आंदोलन करते कॉ अमृतराव महाजन,कॉ मीनाक्षी सोनवणे,कॉ अरुण गायकवाड,मलखान राठोड,कॉ शशिकला निबालकर, कॉ प्रतिभा पाटील यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींना आंदोलन स्थळी माहिती दिली.