मराठा आरक्षणला स्थगिती येत असल्याने तिव्र आंदोलनाचा ईशारा
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे राज्य सरकार ने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने घटनपीठा कड़े वर्ग करतांना त्या आरक्षणावर तात्पुरती स्थागिति दिल्याने अनेक तरुणांना शिक्षणात व नोकरी त अनेक अडचणी ना सामोरे जावे लागत आहे .केंद्र सरकार तसेच मागील महायुति चे व आत्ताचे महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्ते पणा मुळे व योग्य पाठ पुरावा न केल्याने मराठा आरक्षणवार स्थगिति ची वेळ आली आहे .तामिलनाडु, तेलंगना, आंध्रप्रदेश, राजस्थान, आदि ठिकाणी आरक्षण सुनावणी गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे .परंतु तरी मराठा आरक्षणा वर स्थगिति का असा प्रश्न मराठा क्रांति ठोक मोर्चा च्या वतीने विचारला असून आरक्षण उठविन्यासाठी तात्काळ प्रयन्त करण्याची गरज असून जर राज्यसरकार वेळ काढूपणाचे धोरण आखत असेल तर मराठा समाज रस्त्यावर उतरून जबाबदार लोकप्रतिनिधि आमदार, खासदार, मंत्री यांना तालुका जिल्हा बंदी करावी लागेल व राज्य भर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे . जळगाव जिल्हा समन्वयक गणेश पाटिल यांच्या लेटर हेड वर दिलेल्या निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप गायके, बाजार समिति चे माजी सभापति दिलीप श्रीपत पाटिल ,मार्गदर्शक रमेश पाटिल ,प्रलाद बोरसे, तालुका समन्वयक अजय पाटिल, सचिन पाटिल, किरण पाटिल, अरुण पाटिल, पांडुरंग गवंदे ,प्रशांत पाटिल, सागर पाटिल यांच्या सह्या आहेत .