<
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.
या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी आज मराठा समाजातील लॉक डाऊन आणि कोरोना चे सर्व नियमचे पालन करून तरुण रस्त्यावर उतरले असता
जामनेर शहरात नगरपालिका चौकाजवळ सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
त्याच प्रमाणे मराठा क्रांती मोर्चाने ठरविल्याप्रमाणे जामनेर चे आमदार आणि माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या निवासस्थानी डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.
सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित होते.
सोशल डिस्टन्स ठेवून , कोरोना चे सर्व नियम पालन करून तरुणाईने दिलेल्या घोषणांनी जामनेर शहर नगर परिषद चौक दणाणून गेले होते.
आमदार गिरीश भाऊ महाजन हे मुंबईला असल्याने मराठा समाज क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भारतीय जनता पार्टी बांधील असल्याचे प्रतिपादन यावेळी गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांची बोलताना केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज जामनेर शहरातील राजमाता जिजाऊ चौक नगर परिषद समोर रास्ता रोको , डफली बजावो आंदोलन जोरदार पणे करण्यात आले.
मराठा क्रांती ठोक मोर्चा चे सकल कार्यकर्ते, सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तेथून गिरीशभाऊ महाजन यांच्या घरासमोर तेथे जोरदार डफली बजावो करण्यात आले.
आमदार गिरीश भाऊ महाजन घरी नव्हते. मोबाईल वरुण आंदोलकांच्या भावना त्यांनी जाणून घेऊन मराठा आरक्षण समिती मधे आपण होता त्यातील बारकवे आपल्याला माहित होते नेमक स्थागिति च कारण? भाजपा ची अधिकृत भूमिका काय ? उच्च न्यायालयात तुम्ही दिलेले आरक्षण राहिले मग सुप्रीम न्यायालयात का टिकले नाही ? आपल्या मतदार संघात बहुतांशी मराठा समाज आहे म्हणून आपण प्रयत्न करणार कि नाही ? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यावर भाजपा तसेच विरोधी पक्षनेते फडणवीस यानी बारीक सारिक विचार करुण आरक्षण दिले होते .परंतु महाविकास आघाडी ने योग्य पाठपुरावा न केल्याने त्यावर स्टे आला . तर आरक्षण वरील स्टे कमी करण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकार च्या पाठीशी असून योग्य ते मार्गदर्शन आरक्षण दिलेल्या उपसमिति चा भाग म्हणून आम्ही या सरकार ला करीत असल्याची ग्वाही आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी दिली.
तसेच केंद्र सरकार अध्यादेश काढू शकते. असे त्यांनी सांगितले. तर राज्य व केंद्र सरकार यांच्या राजकारणात इतर राज्याच्या आरक्षणवार स्टे मिळाला नाही. पण आपल्या राज्यात मिळाला यावर त्यांनी सुप्रीम कोर्ट च्या निर्णयाला आव्हान देता येत नाही .
असे सांगुन वेळ मारली !आंदोलनात सर्व राजकीय पक्षाचे समाज बांधव तसेच युवक वर्गाचा फार मोठा भरणा होता .
आंदोलनात प्रदिप गायके, मनोजकुमार महाले, माधव चव्हाण ,बी .आर .पाटिल सर्, गोपाल पाटिल ,डॉक्टर बाजीराव पाटिल ,योगेश पाटिल ,सागर पाटिल, प्रल्हाद बोरसे, अमोल ठोबरे, राम अपार,
विश्वजीत पाटिल , जितेश पाटिल, अतुल सोनवणे, रवि बंडे, गोपाल मराठे, अमोल चव्हाण, अविनाश बोरसे, प्रविण गावंडे, आकाश बंडे, गोपाल चौधरी, अमोल पाटिल ,कपिल पाटिल,समाधान थाटे, श्रीराम पाटिल, दशरथ पाटिल, रूपेश पाटिल, कपिल गायकवाड़, जीतू गवळी, गौरव पंडित, यांच्यासह मराठा क्रांती ठोक मोर्चा चे असंख्य तरुण आंदोलनासाठी उपस्थित होते.
घोषणांनी दणाणले जामनेर!
जामनेर शहरात लॉक डाऊन नंतर पहिल्यांदाच जोरदार असा मराठा समाजाचा मोर्चा निघाला. सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या त्यामुळे जामनेर शहर दणाणून गेले होते.
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,
जय जिजाऊ,
जय शिवराय ,
केंद्र सरकार च करायच काय ,राज्य सरकार च करायच खाली डोक वरती पाय ,
अस कस देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही ,
तुमच आमच् नात काय जय जिजाऊ जय शिवराय ,
एक मराठा लाख मराठा
घोषणानी परिसर दणाणून गेला होता.