Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टरांची व्हिजीट समाविष्ट असल्याने कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टरांची व्हिजीट समाविष्ट असल्याने कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) – खाजगी रुग्णालयात असलेल्या एकूण बेड क्षमतेपैकी 80 टक्के खाटा कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव बेडस म्हणून ठेवण्याचे शासन निर्देश आहेत. त्यानुसार हॉस्पिटलच्या एकूण बेड संख्येपैकी राखीव 80% बेडकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दिनांक 31 ऑगस्ट, 2020 मधील तरतुदीस अधीन राहून अनुसूची क प्रमाणे लागू राहतील. उर्वरित 20 टक्के खाटांना खाजगी रुग्णालयाने प्रमाणित केलेल्या दरानुसार रक्कम देय राहील. याबाबतची प्रसिद्धी शासनाच्या निर्देशानुसार संबंधित खाजगी रुग्णालयांनी 80-20 याप्रमाणे खाटांची रूम क्रमांकांबाबतची माहिती दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी खाजगी रुग्णालयांना दिले आहेत.
दिनांक 21 मे, 2020 च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने आदेश क्रमांक 410, दि. 11 ऑगस्ट, 2020 व 461, दि. 9 सप्टेंबर, 2020 समवेतचे “क” विहित खाजगी रुग्णालयाचे पॅकेज व्यतिरीक्त दरपत्रक रद्द करण्यात येत आहे. दि. 31 ऑगस्ट, 2020 चे अध्यादेश “क” अनुसूचीनुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून विहित दरापेक्षा जादा आकारणी केल्यास ती लेखापरीक्षण पथकाने वसूल पात्र ठरवावी. व त्या रुग्णालयास अध्यादेशामधील संदर्भ (Referance) एक ते सात अन्वये शल्य चिकित्सक, जळगाव यांनी लेखापरीक्षण पथकाने सुचवलेली वसुलपात्र रक्कम पडताळणी करावी. वसुलपात्र रक्कम संबंधित रुग्णालयाने रुग्णास परत करणेबाबत शल्य चिकीत्सक यांनी नियमित आदेश प्रस्तुत करावे. असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
याबाबत नियंत्रण ठेवून दैनंदिन विहित कार्यवाही अवलंबावी व दैनिक अहवाल विहित कार्य प्रणालीस सादर करावा. शासन अधिसूचना दिनांक 31 ऑगस्ट, 2020 मधील परीच्छेद क्रमांक 12 नुसार शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टर यांची व्हिजीट समाविष्ट असल्यामुळे कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये. डेडीकेट कोव्हिड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेल्या प्रत्येक खाजगी दवाखान्यात शासनाचे लेखा विभागाचे अधिकारी देयकाचे ऑडिट करण्यासाठी नियुक्त केलेले आहेत.
अधिक माहितीसाठी अथवा तक्रारीसाठी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अथवा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2226611 यावर संपर्क साधावा. रुग्णालयाच्या स्वागत कक्षाने रुग्णालयाकडे दैनंदिन उपलब्ध असलेल्या खाटा (Bed Management System) व्यवस्थापन समिती साठी व दाखल होणाऱ्या रुग्णांकरिता वेळोवेळी माहिती उपलब्ध करून द्यावी. असेही अभिजीत राऊत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ६११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो सांगणाऱ्यांच्या अमिषाला बळी पडू नका आदिवासी विकास विभागाचे लाभार्थ्यांना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d