<
जळगाव(चेतन निंबोळकर)- मयूर अरुण वाघ यांचा जन्म राणीचे बांबरुड येथे एका शेतकरी घराण्यात झाला असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले आहे. त्यांचा पूर्वीपासुन ते आजपर्यतचा प्रवास हा शेतीच आहे. त्यांचे शिक्षण बि.ए. झालेले आहे. त्यांचे वय वर्ष १८ असताना वडीलांचा हृदय विकाराने मुत्यू झाला. तो दिवस खुपच वाईट होता वाघ परीवारासाठी. घरात त्यांच्या आजोबांचे वय होते ८७, त्यांच्या आईचे वय ४५, त्यांची बहीण वय २२, आमचे मोठे भाऊ वय २० व त्यांचे वय १८ ह्या सर्वाची व घराची व शेतीची जबाबदारी ही त्यांच्यावर पडली. त्यांच्या मोठेभाऊंचे शिक्षण चालु होते. मग घरात एक तरी घरी शेती सांभाळणारा पाहीजे म्हणुन त्यांनी हसत मुखाने शेताची जबादारी स्विकारली. त्यांच्यावर कमी वयात शेतीची खूपच मोठी जबादारी पडली. वडील गेल्यानंतर तर ते खूपच खचले होते. त्यांची वेळोवेळी त्यांना आठवण येत असे, तसेच त्यांनी शेतीची जबाबदारी तर स्वीकारली पण शेतीतील कोणत्याही पिकाविषयी त्यांना माहीती नव्हती. मग हळु हळु त्यांनी केळी पिकाची लागवड केली. पाच महिन्यानंतर त्यांच्या शेतातील परिसरात खूप जोरदार वादळी पाऊस झाला. तेव्हा ८ हजार केळी बागेचे लाखोंचं नुकसान झालं. हा त्यांचा शेती मधील पहीलाच पराभव होता. ते म्हणतात माझी पहिली सुरवात ही पराभवाने झाली आणि तेही कमी वयात. तेव्हाच त्यांना वडिलांची आठवण झाली. मग नंतर त्यांनी तीन एकरात पपई लागवड केली. त्या पपईच्या बागेला व्यवस्थित संगोपन करुन लहानाची मोठी केली. हे असतानाच दोन महीन्यातच त्यांच्या गावात चार ते पाच किलो वजनाची गार पडली. त्यानंतर त्यांनी सकाळी पाच वाजेला गारपीट बंद झाल्यावर लगेच शेतात गेले तर संपूर्ण तीन एकरातील पपई ही जमीनदोस्त झाली होती. लाखो रुपये खर्च करुन हाती काहीच आलं नव्हतं. त्यांचं स्वप्नं होत की, आपण काही तरी नविन पिक लागवड करु, पण हाताला यश मिळतच नव्हते. त्यावेळेस ते खूपच खचले. पण त्यांनी डोळ्यासमोर वडिलांना आणून स्वतःला हिम्मत दिली. कारण त्यांचे वडील त्यांना नेहमी सांगायचे व्यक्तीला जो पर्यत अडचण येत नाही तो पर्यत चांगला मार्ग सापडत नाही. कारण त्यांना कमी वयात खूप खडतर अनुभव आले होते, मग त्यानंतर त्यांनी ठरवले कि आपण १२ महिन्याची पिके न घेता लवकर येणारे पिके घेऊ व त्यांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी कमी दिवसात येणारे पिके जसे स्विट काॅन मका, पत्ता कोबी व रब्बीचा मका, बाजरी ही पिक घेऊन कमी पाण्यात जास्त उत्पादन घेतले. मग नंतर मोसंबीची ६०० रोपांची लागवड केली. नंतर हळू हळू यश हे मिळत गेलं व नवा मार्ग सापडत गेला. मग मोसंबी बागेत आंतरपिक म्हणुन अद्रक लागवड केली. नंतर पत्ता कोबी व उन्हाळात रब्बी मध्ये आंतर पीक म्हणून उन्हाळी तीळ, नंतर कपाशी, मार्च महीन्यात अरबी पिकाची लागवड अशी आंतरपिके त्यांनी एकट्या मोसबी बागेत घेतली. त्यानंतर त्यांना शेतीचे प्रचंड वेड लागलं व शेतात नवनवीन प्रयोग करने हा त्यांचा छंद बनला. नविन पिकांची माहीती घेणेच नाही तर लगेच तिचा अभ्यास करुन प्रयोग यशस्वी करुन दाखवणेच हे त्यांनी ठरवलं. ते सध्या मोसंबी बागेत नवनविन खुपच आंतर पिके घेत असतात. मागे त्यांनी मोसबी बागेत आंतर पिक म्हणुन कमी खर्चात व कमी पाण्यात जास्त उत्पादन घेतले ते म्हणजे पत्ता कोबी नंतर उन्हाळी तीळ, कपाशी, अद्रक अशी आंतर पीक घेतलेली आहेत. आता मोसबी बागेत पाच आंतर पिके आहेत. पट्टा पद्धतीने गांडूळ शेती करणे, जैविक Waste decomposer याचा वापर करणे. जैविक बिज प्रक्रीया करणे. रस्त्याला लागुनच त्यांची शेती असल्याने त्यांनी एक प्रयोग केला. चार एकर शेतात ८०१४ चारा पत्ती या उसाच्या वाणची निवड केली. हे वाण सहा महीन्यात कापणी ला येतं म्हणुन या उसाची लागवड केली. पण जेव्हा ऊस कापणीला आला तेव्हाच दुष्काळ पडला.तर या दुष्काळात त्यांच्या गावातील कोणत्याही शेतकरी कडे गुरांसाठी चारा मिळत नव्हता, तर मग सर्व शेतकऱ्यांनी माझ्या उसाची गुरांसाठी मागणी केली तेव्हा ते त्या प्रयोगात यशस्वी ठरले.
आजपर्यंत शेतीसाठी केलेली जुगाड अवजारे
२०१७ साली त्यांच्या शेतात कपाशी लागवड केली व गावातील सर्वच परिसरात कपाशी पिक लागवड जास्त असल्यामुळे सर्वच शेतकऱ्याचे काम एकत्र आले म्हणुन मजुर उपलब्ध होत नव्हते. कपाशीच्या काड्या किंवा पहीखाट्या जमा करण्यासाठी मजुर मिळत नव्हते. मग त्यांनी विचार केला की आपण यातुन काही मार्ग काढू शकतो का? मग आजोबांच्या काळातील १९९१ सालच जुना टॅक्टरचा वापर करुन त्याला टिलर जोडुन व नाळा म्हणजे( चरई, रस्सी, चराठ) बांधुन टॅक्टर रिव्हर्स चालवुन शेतातील सर्वच कपाशी काड्या फक्त २ तासातच एकाच ठिकाणी जमा केल्या. खर्च आला फक्त २५० रुपये त्यांना ज्या शेतात १२ मजुर लागणार होते व चार ते पाच दिवसांचा वेळ लागला असता. त्याऐवजी पाच एकर मध्ये फक्त २५० रुपये डिझेल मध्ये काम झाले. नाही तर त्यांना २४०० रुपये मजुरी लागली असती व तीन ते चार दिवस वाट बघावे लागले असते. ही आहे जुगाड अवजारे ची करामत. २०१९ ते २०२० साली मका पिकावर लष्कर अळी चा मोठया प्रमात प्रादुर्भाव झाला होता मका उत्पादक शेतकरी संकटात होते कारण अळी फवारणी करुन खुपच खर्च केला ५ ते ६ हजार रुपये खर्च करुन देखील यश मिळत नव्हते. मग त्यांनी विचार केला कि अळी मक्याच्या पोंग्यात आहे. कारण अळी पोंगा नष्ट करते. मग त्यांनी रिकाम्या पाण्याच्या बॉटल जमा केल्या. त्याच बाटलीच्या बुचला बारीक सुई ने छिद्रे पाडुन २०० लिटर पाणीच्या टाकीत औषधी टाकुन त्या बाटली मध्ये औषधी भरुन प्रत्येक मक्याच्या पोंग्यात पिचकारी मारुन टाकले. त्याचा रिजल्ट फक्त १ तासातच मिळाला व १०० टक्के हा प्रयोग देखील यशस्वी झाला. त्यांचा हा प्रयोग बघुन त्यांच्या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला. कारण त्यांना एक एकर मध्ये १० पंपच्या औषधी व मजुरीचा खर्च येत होता १४०० रुपये तर त्यांनी हा यशस्वी प्रयोग करुन फक्त खर्च आला ४५० रुपये. सन २०२० सालीही त्यांनी जुगाड करुन मका पिकाची लागवड यशस्वी करुन दाखवली. शेतीकामे अशातच मजुराचा तुटवडा यामुळे शेतावर टॅक्टरच्या साह्याने दोन मजुर लावुन जुगाड यंत्राचा वापर करुन मक्याची यशस्वी लागवड केली. त्यांना मक्याची लागवड करायची होती. त्यासाठी त्यांनी मजुराची शोधा शोध सुरु केल्यानतर पुरेसे मजुर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे त्यांनी टॅक्टर साह्याने केवळ दोन मजुर लावुन जुगाड यंत्राचा वापर करुन रब्बी मकाची लागवड केली. या जुगाड यंत्राचा साह्याने झालेली ही लागवड पाहण्यासाठी गावातील व परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी भेट दिल्या. हे जुगाड यंत्र त्यांच्याकडे असलेल्या जुना टॅक्टरच्या साहाय्याने व त्याच्या जोडीला टिलर व दोन लोखंडी फाळ व छोटे कोबडेचा वापर करुन हे जुगाड यंत्र तयार केल. या यंत्राच्या साह्याने चार एकर वरील क्षेत्रात केवळ दोन मजुरच्या साह्याने मक्याची लागवड केली.एक एकर मक्यासाठी चार मजुर अपेक्षित असतात. त्यानुसार चार एकर साठी १६ मजुर लागतात. परंतु या जुगाड यंत्राने हिच लागवड दोन मजुरांनी एकाच दिवसात केली. व मक्याची विक्रमी उत्पादन घेतले एकरी ४३ क्विटल. तर त्यांनी तयार केलेल्या जुगाड यंत्राला पाहण्यासाठी परिसरातील बरेच शेतकरी येऊन गेले.अशा यंत्रामुळे वेळेची व पैशाची बचत होते. हे सर्व ते हे अनुभवातुन शिकलो आहे.
आजपर्यंत मिळालेले पुरस्कार
१ डाॅ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार २०१९२ विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शेतकरी पुरस्कार २०१९३ खान्देश गौरव पुरस्कार २०१९४ अॅग्रोवर्ड कुषीगौरव पुरस्कार २०१९५ किसान गौरव पुरस्कार २०१९
भविष्यातील वाटचाल
भारत हा कृषी प्रधान देश आहे. म्हणुन मी या भुमातेची सेवा करुन भुमिपत्र म्हणुन कार्य करने. आताच्या युवा शेतकरी बांधवाचा शेती विषयक सकारात्मक द्रूष्टीकोन बदलणे व आदर्श निर्माण करणे हे आहे.