<
एरंडोल(प्रतीनिधी)- तालुक्यातील गालापुर येथील संपुर्ण आदिवासी वस्तीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी च्या विद्यार्थाना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्य शासन व शालेय शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानार्तंगत मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
किशोर पाटिल कुंझरकर बोलताना म्हणाले, महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण विभाग राज्यातील वंचित घटकांना विकासाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित असून सर्वांनीच सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, तसेच स्वच्छता आरोग्य व शिक्षणाची कास धरावी, असे मत शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटिल कुंझरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. आदिवासी बांधव व वाडी वस्ती तांड्यावरील सर्वांनीच शिक्षणाच्या व विकासाच्या मुख्य प्रवाहात आपल्या भावी पिढीला आणण्यासाठी जागृत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.त्यासाठी समाजव्यवस्थेतील स्वयंसेवी संस्था समाजसेवक तसेच सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.सार्वजनिक जीवन जगत असताना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात माझा अनेक जण प्रेरणा देऊन गौरव करतात, याचे कारण आम्ही विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी आहोत ते आमचे सर्वस्व असून शाळा हीच आमची पंढरी आहे आज सर्व विद्यार्थ्यांचा गौरव माझ्या करीत असल्याचे सांगून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच चाळीसगाव तालुक्यातील समाजसेवक किशोर पाटील ढोमनेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना दप्तर पाठवल्याने आदिवासी वस्तीला आज आनंदाचे उधाण आले होते.नव्या कपड्यांमुळे सर्वच विद्यार्थी आनंदी झाले, शिक्षणात बद्दल चिकाटी धरल्यास पुढे चालून त्यांच्या जीवनात कायमस्वरूपी आनंद निर्माण होईल, असे यावेळी आभार मानताना कुंझरकर यांनी म्हटले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील, सुभाष भिल,सामाजिक कार्यकर्ते आरिफ शेख, सुनील भिल, कालू पवार ,नरेश बागुल, सीमाताई सोनवणे, शबाना शेख, माजी सैनिक महाजन अप्पा, सर्व विद्यार्थ्यांचे आई-वडील उपस्थित होते.