<
वडजी/भडगांव :कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल वडजी येथे संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या 19 व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून संस्थेचे आधारस्तंभ चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील,महाराष्ट्र राज्य मंत्रालय सचिव दादासाहेब प्रशांतराव विनायकराव पाटील,संस्थेच्या सचिव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ.पूनमताई प्रशांतराव पाटील यांनी शालेय इमारतीच्या वरचे मजल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन कोरोना पार्श्वभूमिवर मास्क,सेनिटर व फिजिकल डिस्टेंन ठेऊन शुभारंभ केला.
प्रारंभी विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती,कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,दिवंगत संचालिका मातोश्री आजीसो.कमलताई हरी पाटील, दिवंगत संचालक दादासाहेब युवराज हरी पाटील,आण्णासाहेब अशोक हरी पाटील,दिवंगत संचालिका वात्सल्यसिंधु साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या प्रतिमा पूजन,माल्यार्पन करून स्मरण केले.भारतीय संस्कृती प्रमाणे पुरोहितांनी विधिवत पूजा दादासाहेब प्रशांतराव पाटील व डॉ.पूनमताई पाटील यांचे शुभहस्ते करून बांधकामाचे भूमिपूजन केले.2021 वडजी विद्यालयाचे स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने सुसज्ज परिपूर्ण इमारत बांधकाम करून 10 वी बोर्ड परीक्षा,11वी,12वी चे वर्ग,इंग्लिश मिडियम व सेमी माध्यम,गुणवत्ता पूर्ण शिक्षण सुविधा साठी आपली संस्था सतत प्रयत्नशील आहे असे उपस्थित संस्थेच्या मान्यवर पदाधिकारी यांनी आवर्जून नमूद केले. कोविड-19 कोरोना काळात विविध ठिकाणी कर्तव्य बजावलेल्या कर्मचारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तिपत्र देवून गौरव करण्यात आला.तसेच कर्मवीर तात्यासाहेब पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत आयोजित विविध ऑनलाइन शैक्षणिक स्पर्धा बक्षिस वितरण प्रतिनिधिक स्वरुपात करण्यात आले. सदर प्रसंगी मुख्याध्यापक डी.डी.पाटील,वरिष्ठ शिक्षक बी.वाय.पाटील,जेष्ठ शिक्षक एस.जे.पाटील,सप्ताह समिती प्रमुख जे.एच.पवार,सर्व समिती प्रमुख़,सदस्य,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर सहकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.