<
प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांना नेहमीच
विद्यार्थ्यांप्रमाणे न्याय मिळावा अशी मागणी जळगाव जिल्हा फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे प्रदेशाध्यक्ष भूषण संजय भदाणे यांच्या मार्गदर्शनाने व स्वप्नील प्रमोद हिरे अध्यक्ष फार्मसी स्टुंडट कौसील उत्तर महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष महेश रमेश पाटील व जिल्हा सचिव प्रतीक यशवंत पाटील यांनी ट्विटरद्वारे पत्र पाठवून केली
या मागणीत औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यास क्रमातील प्रथम , द्वितीय ,तृतीय व चतुर्थ वर्षातील चौथे सत्र व सहावे सत्र व सातव्या सत्रातील पुनरपरीक्षार्थी बॅकलॉग विद्यार्थ्यांचा न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे.
पुनरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश देण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थी वर्ष वाया जाण्याच्या भीतीने प्रचंड मानसिक तणावात आहेत.
बॅकलॉग ड्रॉप विद्यार्थ्यांना परीक्षा विंटर 2019 ला दिलेल्या आहेत व शैक्षणिक वर्ष 2021 पासून सुरू होणार असेल तर विंटर 2019 चे पेपर समर 2021 मध्ये देणे विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते.
त्यामुळे नियमित विषयांचा अभ्यास करताना मागील विषयामुळे पुन्हा विद्यार्थ्यांना ड्रॉप लागेल.
त्यामुळे बॅकलॉग ड्रॉप विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश भेटावा व सातव्या सत्रातील पुनर्परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा जीआर काढावा अथवा असाइन्मेंट घेऊन उत्तीर्ण करावे परीक्षासंदर्भात निर्णयामुळे विद्यार्थ्यांना खोळंबा होऊ शकतो होऊ नये म्हणून हे निवेदन जळगाव जिल्हा फार्मसी स्टुडंट कौन्सिलच्या वतीने मा. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांना देण्यात आले.