<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ३०४ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज ९०९ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ४१४५४ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २९,(३८ RATI),जळगाव ग्रामीण ०५,(०३ RATI), भुसावळ २१,(०९ RATI), अमळनेर २५(०३ RATI), चोपडा २८,(२४ RATI),पाचोरा ०३, (०३ RATI), भडगाव ००,(०२ RATI), धरणगाव ००, (०५ RATI),यावल ०१, (०५ RATI), एरंडोल ०६,(०२ RATI), जामनेर ११,(१८ RATI), रावेर ०५, (०४ RATI), पारोळा ००,(०२ RATI), चाळीसगाव १७,(१२ RATI), मुक्ताईनगर ०६ (०० RATI), बोदवड ०२,(०५ RATI), इतर जिल्ह्यातील-०७, (०३ RATI), जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४८४८४ इतकी झाली आहे. आज ०६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ११९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ५८४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.