<
कानळदा [ ता.जळगाव ]
ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे सत्य,अहिंसा,स्वदेशी व बहिष्कार या मार्गाचा अवलंब करून तसेच राष्ट्रपिता म्हणून परिचित महात्मा गांधी यांची व लाल बहादूरसशास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.के.पी.चव्हाण सर,उपमुख्या.श्री.के.एम.विसावे सर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख श्रीम.व्ही.जे.पवार यांनी प्रस्तावानेतून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मवाळ भूमिकेचे समर्धन करून,सनदशिल मार्गाने आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे बहाल करून दिले व स्वातंत्र्योत्तर काळात लाल बहादूरशास्त्री यांचे योगदान याविषयी कथन केले.विद्यालयाचे उपशिक्षक श्री.एम.जे.पाटील सरांनी आभारप्रदर्शन केले.