<
जळगांव(धर्मेश पालवे):- येथील जळगांव जिल्हा जागृत जनमंच हा पदविरहीत,पक्षविरहीत लोकसमूहांचा स्वयंस्फुर्त असा समाजसेविचा एक गट म्हणून जिल्ह्यातील विविध प्रश्नावर शासनाला धारेवर धरनारे व्यासपीठ म्हणून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर प्रसिद्ध आहे. याच अनुसरून जळगावातील शेतकरी, सैनिक व बहुमूल्य नागरिक यांना भेडसावत असणाऱ्या समस्या बाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हा जागृत जनमंच चे मा शिवराम पाटील,हॅपी मिरर फाऊंडेशन चे डॉ आशिष जाधव,जवान फौंडेशन चे अध्यक्ष मा ईश्वर मोरे, व अशपाक भाई पिंजारी एका पेक्षा अधिक संस्थेचे पदाधीकारी आदी सह विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी नि एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवले होते.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न पाण्या विरहित प्रतिकात्मक अस हे उपोषण होतं. जिल्हाधिकारी यांच्या निवेदनात जिल्हयातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी व कुटुंबासाठी मागण्या होत्या, पीडित शेतकरी आणि कुटूंबियाकरिता मागण्या होत्या, जळगांव जिल्ह्यात शेतकरी व्यतिरिक्त होणाऱ्या आत्महत्या बाबत च्या मागण्या सह ,देशातील बलिदान झालेले सैनिक व त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबियाकरिता च्या मागण्या व रस्त्याची दुरावस्था आणि राष्ट्रीय महामार्गात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्ती आणि त्याच्या प्रमाणात होणाऱ्या वाढी रोखणे बाबत च्या प्रत्येकी प्रमुख मागण्या नमुना होत्या.
उपोषणार्थी प्रा डॉ आशिष जाधव यांच्या सखोल अभ्यासपूर्ण मुद्यावर उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले,मा ईश्वर मोरे यांनी सैनिकांवर होणाऱ्या दुर्लक्षाच्या बाबतीत दुःख व्यक्त करत शासनावर संताप व्यक्त केला.मा अशपाक पिंजारी यांनी रस्त्यावर होणाऱ्या अपघाताच्या बाबतीत ठळक मुद्दे लक्षात आणून दिले. धोबी समाज भूषण मा विवेक ठाकरे यांनी शासनाला शेतकरी व सैनिक फक्त राजकारण जवळ येताच आठवतात मात्र इतर दिवशी या रक्षण व पोषण कर्त्याला राजकीय लोकं विसरतात असा आरोप ही शासनावर व जनतेच्या प्रातिनिधी म्हणवून घेणाऱ्या प्रेतक राजकारणी लोकांवर केला,त्याच बरोबर जळगांव जागृत जनमंच चे मा शिवराम पाटील यांनी नुकत्याच आत्महत्या ग्रस्त शेतकरी वर झालेल्या अनुदान वाटणी विलंबना चा मुद्दा उचलत आमदार व संबंधित शासकीय अधिकारि यांच श्रेय लाटण्याचं काम हे लाजिरवाणी बाब असल्याचं सांगितलं.
सदर उपोषण हे जिल्हा अधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना देऊन दुपारी ४वाजता पत्रकार परिषद ही भरवण्यात आली ,व संध्याकाळी ५ वाजता सोडण्यात आले.सदर उपोषणास मा मुकुंद सपकाळे, मा दिगम्बर बडगुजर,मा भारत ससाणे, श्रीमती सपना कोळी, जेष्ठ पत्रकार मा उमाकांत वाणी आदी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी हजर होते.