<
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
कोरोना आजारावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत ,मुख्यकार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.एस. पोटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
मोहिमेंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात ३ लाख ९६ हजार २५ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
गटविकास अधिकारी एन.आर.पाटील यांच्या कडून 302 टीम ची नेमणूक करून
टीममार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. टीममध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षण व एक स्वयंसेवक यांचा समावेश करण्यात आला होता.
सदर मोहिमेत ५४२ संशयीत रुग्ण शोधण्यात आले.त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यापैकी 202 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. सर्वेक्षणा मध्ये ६८ हजार सातशे सात घरांना भेटी देण्यात आल्या.८२ रुग्ण हे शरीराचे तापमान जास्त असलेले,७६ रुग्ण ऑक्सिजन चे प्रमाण ९५% पेक्षा कमी असलेले ३३४ सर्दी, ताप, खोकल्याचे तर ५८ रुग्ण सारी या आजाराचे आढळून आले.
सर्वेक्षणात ३८९१ उच्च रक्तदाबाचे,२९०२,डायबेटीस चे,१२१ दम्याचे,३१किडनी च्या आजाराचे,७२ कॅन्सर चे ९८ टीबीचे, कुष्ठरोगाचे ३० तर लठ्ठपणा जास्त असलेले १७३ रुग्ण आढळून आले.
तालुका पर्यवेक्षक बशीर पिंजारी यांच्या पर्यवेक्षणा अंतर्गत जी.पी.लोखंडे, भागवत वानखेडे, एम.टी.माळी, पुंडलिक पवार, अण्णा जाधव, सुखदेव बाविस्कर, अशोक सुरळकर,व्ही. एच. माळी, गजानन माळी यांनी व तालुक्यातील सर्व गटप्रवर्तक यांनी मोहिमेचे सुपरव्हीजन केले.
“कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे, गर्दी न करणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे काही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून उपचार व विलगिकरण करणे आवश्यक आहे तरच आपण कोरोना ला नियंत्रणात आणून आपण कोरोना वर विजय मिळवू” असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी आरोग्य विभागामार्फत नागरिकांना केले.