<
जळगांव(प्रतिनीधी)- खाजगी वाहनांच्या समोर दर्शनी दिसेल अशा स्वरूपात पोलीस, न्यायाधिश, महाराष्ट्र शासन, विज वितरण, एलआयसी-भारत सरकारचा उपक्रम, कार्यकारी अभियंता अशा प्रकारच्या विविध शासकीय पद धारण करणाऱ्या व्यक्तींकडून स्वतःच्या वापराच्या वाहनांमध्ये पाट्या लावण्याचा प्रकार मोठया प्रमाणात वाढला आहे. शहर, जिल्हा व संपुर्ण राज्यात अशा पाट्या लावून आम्ही काही वेगळे आहोत. अशा तोऱ्यात अनेक जण स्वतःला मिरवत आहे. या अशा प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेला मोठा धोका उद्भवू शकतो हे चित्र आहे. अशा पाट्या लावुन चोर, दरोडेखोर, अतिरेकी व सामाजिक विघातक काम करणाऱ्या व्यक्ती प्रवास करू शकतात अशी भिती निर्माण होते. कारण अशा पाट्या लावलेली व्यक्ती विशिष्ट पदावर आहे म्हणून वाहतुक पोलीस, महामार्ग पोलीस, परिवहन विभाग दुर्लक्ष करतात असे चित्र आहे. महाराष्ट्र वाहन कायदा व केंद्रीय वाहन कायद्यामध्ये अशा प्रकारच्या पाट्या लावण्याबबत कोणतीही तरतुद नाही म्हणून अशा वाहनांवर कारवाई करावी व राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन परिवहन आयुक्त यांच्याही निदर्शनास आणुन द्यावी, दरम्यान खाजगी वाहनांवर लालदिवे वापराबाबत मनसे ने २०१३ मध्ये तक्रार केली होती. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली होती अशीच कारवाई आता व्हावी, असे निवेदन अँड. जमील देशपांडे, मुकुंदा रोटे,विनोद शिंदे, संदीप मांडोळे, मतीन पटेल तन्वीर तडवी आदींच्या वतीने देण्यात आले.