<
जळगांव(प्रतिनिधी)- पंतप्रधान जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाच्या उत्तर महाराष्ट्र महासचिव पदी सुचित्रा महाजन यांची निवड करण्यात आली. प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष पूशेष आर्य, राष्ट्रीय महामंत्री डॉ.मुकेश शर्मा, श्री भगवान बागुल पंतप्रधान जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसारचे महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र पाठविले आहे. त्या अन्याय अत्याचार निर्मूलन समिती तथा उपभोक्ता उत्थान संघटनेच्या ही जिल्हाअध्यक्ष आहेत. विविध राज्यस्तरीय सामाजिक योगदान पुरस्कार हि त्यांना प्राप्त आहेत. या निवडी बद्दल पुष्पा पाटील, मनीषा पाटील, रेखा खडसे, योगिता शिंपी, लीला चौधरी आदींनी कौतुक करून अभिनंदन केले.