<
जळगांव(प्रतिनिधी)- एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली धरणगांव एकलव्य संघटनेच्यावतीने अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये. तसेच उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील बलात्कार करणाऱ्या घटनेतील गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी. यासंदर्भात धरणगांव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एकलव्य संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली की, मागील काही वर्षापासून धनगर तसेच इतर अनेक जाती अनुसूचित जमातींना असलेले सात टक्के आरक्षणात समावेश व्हावा म्हणून घटनाबाह्य पद्धतीने मागणी करताना दिसतात. त्यात धनगर समाज आघाडीवर आहे. धनगर समाज हा आर्थिक दृष्ट्या राजकीय सक्षम आहे. अनेक अभ्यासक गटांनी त्यांची मागणी चुकीचे असल्याचे त्यांचा आदिवासींमध्ये समजू शकत नाही. असे अहवाल दिलेले आहेत. आदिवासींच्या परंपरा भाषा स्वभाव वैशिष्ट्ये व धनगर समुदायाच्या परंपरा यातही मूलभूत फरक आहे, तसेच उत्तर भारतीय धनगड या जातींच्या नामसाधम्याचा फायदा होऊन आम्ही आदिवासी अनुसूची मध्ये समाविष्ट आहोत असा दावा केला जातो मात्र धनगड ओरॉन समुदायातील आदिवासीतील वेगळी जमात आहे या जातीचा व धनगर समाजाचा कोणताही संबंध येत नाही. आर्थिक दृष्ट्या सक्षम व राजकीय दृष्ट्या संघटित असल्याने धनगर समाजाचे काही नेते आदिवासींच्या राजकीय आरक्षणावरती डोळा ठेवून धनगर समाजाचे फसवणूक करत आहेत. काही राजकीय पक्ष संसद व विधान मंडळात तसेच जाहीर रीत्या भूमिका घेताना दिसतात. परंतु आरक्षण देण्यासाठी निश्चित अशी प्रक्रिया राज्यघटनेत ठरवलेली आहे .त्यामधील अटी व शर्ती मध्ये धनगर समाज बसत नाही. स्वातंत्र्यानंतरही सातत्याने विकासापासून वंचित राहिलेल्या आदिवासी समाज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर कसाबसा आरक्षणाच्या प्रवाहात येऊ लागला आहे. आजही कुपोषणासारख्या समस्या आदिवासी समुदायाला भेडसावत आहे. राजकीय आर्थिक क्षेत्रात आता कुठे सक्षम बनू पहात असताना प्रस्थापित अशा धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण देऊ नये या मागणीसाठी एकलव्य संघटना धरणगांव च्या वतीने निदर्शने करण्यात केले असून. महाराष्ट्र शासनाने ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारला आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट करू नये. अशाप्रकारे पत्रव्यवहार करून आदिवासींच्या न्याय देण्याची भूमिका घ्यावी. तसेच उत्तर प्रदेश मध्ये हाथरस जिल्ह्यात मुलीवर मनीषा वाल्मिकी ही मुलगी शेतात चारा आणण्यासाठी गेले असता. गावातील चार जणांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. व तिचा पाठीचा कणा निकामी झाल्याने तिला श्वास घेण्याचा त्रास होत होता. तसेच तीची जीभ सुद्धा कापण्यात आली ही घटना १४ रोजी घडली असून तिने १५ दिवस मृत्यूशी झुंज देत होती. शेवटी ती मरण पावली. अशा घटनेची सी.बि.आय. चौकशी होऊन जलद गतीने फास्टट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालून दोषींना फाशी झालीच पाहिजे. अशी मागणी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य धरणगांव च्या वतीने करण्यात येत आहे. धरणगांव तहसीलदार यांना निवेदन देतांना एकलव्य विध्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार जिल्हा सचिव संजय मोरे ऋषीदादा सोनवणे अपंग सेल जिल्हाध्यक्ष पिंटू सोनवणे शहराध्यक्ष बापू मोरे सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनवणे श्रावण सोनवणे व एकलव्य संघटना कार्यकर्ते उपस्थित होते.