<
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
भारतात ग्रामीण भागात सर्वप्रथम टेलिमेडिसिन सेंटर जामनेर येथे साकारलं जात असून गेल्या 2वर्षांपासून या हॉस्पिटलचे काम सुरु आहे आणि आज ते लवकरच पूर्णपणे रुग्णसेवेसाठी तयार झालेले आहे.
सदर हॉस्पिटल चा टाय अप रीलायन्स हेल्थ केअर शी असून मुंबई मधील जगप्रसिद्ध डॉक्टर या हॉस्पिटल मध्ये सेवा देण्यासाठी उत्सुक आहेत.
सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे उपचार, सर्व प्रकारच्या चाचण्या या ठिकाणी शासकीय दरात होणार आहेत तसेच सर्व शासकीय योजना या हॉस्पिटल मध्ये लागू आहेत.
जवळपास 50हजार चौरस फूट क्षेत्र असलेले हॉस्पिटल भविष्यात रुग्ण सेवेसाठी तयार झालेले आहे. 250 ऑक्सिजन चे बेड, 150 कोविड साठी राखीव बेड, 20बेड कॅन्सर च्या रुग्णासाठी, कॅन्सर किमोथेरपी युनिट,अनेक डायलिसिस युनिट सह, जागतिक दर्जा चे शस्त्रक्रिया गृह या ठिकाणी आहेत,
उत्तम सेवेसाठी नावाजलेल्या बीवीजी (BVG)या कंपनी चे कर्मचारी येथे कार्यरत आहेत. तसेच येथील अन्नव्यवस्था सुद्धा सुखसागर सारख्या नामांकित रेस्टॉरंट च्या हात आहे .
त्याचप्रमाणे रुग्णसेवेबरोबरच रुग्णालयात प्रत्येक रुग्णाकडे आवर्जून लक्ष देण्यासाठी कर्मचारी आहेत. रुग्णाला काही त्रास होत असेल तर सरळ मुंबई स्थित डॉक्टरांशी संवाद करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फेरंस ची व्यवस्था आहे .
महाराष्ट्राचे आरोग्यदूत मा.गिरीशभाऊ महाजन आणि रामेश्वरभाऊ नाईक यांनी शासकीय योजनाच्या सेवा आपल्या जिल्ह्यात गोरगरिंबाच्या सेवेत उपलब्ध करून दाखविले आहे.