<
जामनेर (प्रतिनिधी) :-अभिमान झाल्टे
ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, जामनेर येथे टेलीमेडिसीन, टेली कन्सल्टींग, टेली ऑपरेटिंग, लाईव्ह cme अशा प्रकारे अद्ययावत सुविधांनी हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे. या हॉस्पिटलचे उदघाटन माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या दि. १३ ऑक्टोबर रोजी होत आहे. यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. माजी मंत्री, गिरीश महाजन यांचे मतदारसंघातील नागरिकांना व जिल्हा वासियांना उत्तम आरोग्य सुविधा योग्य व सवलतीच्या दरात पुरविण्याचे स्वप्न यामुळे पूर्ण होत आहे.
या रुग्णालयामध्ये मनुष्यबळ पुरविण्याचे काम नामांकित बीव्हीजी ग्रुप यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. सदर रुग्णालय हे मुंबई पुण्याच्या धर्तीवर अद्यावत सेवेने सुरू करण्यात येत आहे. ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्यावत मशीन, पॅथॉलॉजी, एक्स-रे-सोनोग्राफी, सिटीस्कॅन, डायलिसीस मशिन, कँसर उपचारासह चाळीस वेळ आयसीयू तसेच चार मॉडेल रोटी 20 वेंटीलेटर 10 सेमी व्हिटेलेटर 200 ओ.टु बेड सर्व प्रकारचे तपासणी कक्ष राहणार आहेत. स्पेशल, जनरल, रिकवरी अशा खोल्या असलेले विविध प्रकारचे वोर्ड या रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येत आहेत.
सदर रूग्णालयात जिओच्या मार्फत तंत्रज्ञानाचा वापर करुण सुविधा आद्यावत करण्यात आलेले आहे. विशेषत: जिओ मार्फत वेब कॅमेरे असलेला वेब तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे . जेणेकरून मुंबई-पुणे येथील तज्ञ डॉक्टर्स ची गरज भासणार आशांना टेली कन्सल्टींग द्वारे रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देणार आहेत. तसेच मुंबई-पुणे येथील डॉक्टर्स जामनेर येथे येऊन काही रुग्णांवर ऑपरेशन करून या भागातील डॉक्टरांना अद्यावत करण्याबाबत लाईव्ह ऑपरेशन म्हणजे cme यांच्यामार्फत शिक्षण देणार आहेत. तसेच शस्त्रक्रिया सुरू असताना एखाद्या डॉक्टरला काही अडचण आल्यास लाईव्ह टेली ऑपरेटिंगची सुद्धा मदत मिळेल. पुणे आणि मुंबई किंवा इतर भागातील तज्ञ लोकांची सेवा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. डायलिसिस विभागामध्ये मुंबई-पुण्यासारख्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली डायलिसिस होणार आहेत. केमो थेरपी व कर्करोग शस्त्रक्रिया करता येणार आहेत. सर्व प्रकारच्या अद्यावत मशीन उपलब्ध आहेत. रुग्णांना याठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू असेल. आयुष्मान भारत योजना, विविध प्रकारच्या विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या योजना चा लाब. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे योजनंचे उपचारदेखील या ठिकाणी विविध प्रकारच्या योजनेतून करुन घेण्यात येणार आहेत.
नवजात शिशु बालकांसाठी एनआयसी व पीआयसीयु अद्यावत सुरू करण्यात येत आहे. पॅथॉलॉजिकल विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन तसेच अद्ययावत अशा प्रकारची सुविधा या रुग्णालयात सुरू करण्यात येत आहे. ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जामनेर येथे अद्यावत मशिनरीद्वारे तपासणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. शंभर ऑक्सिजन बेडचे कोविड 19 रुग्णालय सुरू करण्यात येत आहे.