<
आई घटाबरोबर तू विश्वास पण पेरून दे आता आलीच आहे दुखः मिटवायला तर तुझ्याबद्दल माझी विनंती ऐकून घे.
मला कळलीच नाही याआधी कधी तू.
येणार आहेस इतके रूप घेऊन
कधी भरभरून प्रेम देतेस.
कधी दुर्गा होऊन रौद्ररूप धारण करतेस.
आई तू नेहमीच सत्यासाठी जन्म घेतेस.
आणि तू मरतेही सत्य समजावे म्हणून.
आईची ममता जाणवतेस.
प्रियसीचा प्रेम देतेस.
मैत्रिणी सारखी गरबा ही खेळतेस…
बहिनिसराखी काळजी घेतेस.
तू सखी वाटतेस आई
नसू दे ना आई यंदा गरबा ,
आम्हीं शोशल डिस्तन्स पाळून कोरोनाची सर्व जबाबदारी घेऊ .
फार काही देऊ की नाही देऊ तुला पण
सर्व घर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज करण्याचे वचन देऊ.
आई तूच तर दिसत होती मला ,
अशीच इंजेक्शन घेऊन कोरोनाच्या छातडावर उभी .
रंगीत साड्याच माहित नाही पण हा मास्क चा संदेश देणारी .
आई … आई …
एक सांगू का ग तुला ?
आई बस ना ग आता …
या महामारीला टाळ ग ..!
सीमेवर जवान लढतो आहे अन् आत किसान ढसा ढसा रडतो आहे ..
मला काहीच नको आई …
बस त्याच्या चेहऱ्यावर हसू आन ना ग ..!
✍️ कु. सुरज सुभाष जाधव
(कवी , कलाकार , युवा वक्ता)
नांदा तांडा ,
ता. सोयगाव, जि. औरंगाबाद
BBA , IMR collage , jalgaon
मो. 9529883747
Email:- [email protected]