<
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
जामनेर तालुक्यामध्ये उपजिल्हाधिकारी गोडक्ष गाडेलकर यांनी भेट देऊन याप्रसंगी त्यांनी घरोघरी जाऊन सर्वे केला.
याची पाहणी केली असता नेरी येथील जनता हायस्कूल च्या कोरोना तपासणी कॅम्पला व जामनेर येथील आशीर्वाद हॉस्पिटल, विजयानंद हॉस्पिटल, कमल हॉस्पिटल, जी.एम. हॉस्पिटल ला भेट दिली असता उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली.
या ठिकाणी त्यांनी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सुचना केल्या की आपल्या ओपीडी मध्ये जे रुग्ण येतात त्यांची कोरोना चाचणी करणे व कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
शासन आता सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या करीत आहे.
मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या मतानुसार खाजगी डॉक्टरांनी ओपीडी ला येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. काही रुग्णांना कोरोना असून सुद्धा तपासणी करीत नाही त्यांना सापडून साथ नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.असे
सर्व खाजगी डॉक्टरांनी ओपीडित आलेल्या रूग्णांना कोरोना चाचणी करण्याचे सांगितले.
येथे सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या जाईल यासाठी रजिस्टर डॉक्टर जवळ आपण Antigen व RTPCR किट व एक जि. प./आरोग्य/नगरपालिका कर्मचारी उपस्थित राहील.
त्यांच्या उपस्थिती मध्ये खाजगी डॉक्टरांनी स्वतः सुद्धा मोफत कोरोना चाचणी ची प्रकिया पूर्ण करू शकतात असे त्यांनी सांगितले.काहींना कोरोना चाचणी घेणे अडचणीचे वाटत असल्यास आरोग्य अधिकारी,तसेच कर्मचारी यांच्याकडून याविषयीचे प्रशिक्षण दिले जाईल असे त्यांनी सांगितले.
खाजगी डॉक्टरांच्या ओपीडी ला कोरोना चाचणी ची मोफत सोय उपलब्ध असल्यास नक्कीच 50% पेक्षा जास्त रुग्ण चाचणी करून घेऊ शकतात व जर कोणी पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला होम कोरंटाईन ची परवानगी आता सहजपणे मिळेल.
आपल्या तालुक्यातील कोरोना नियंत्रणासाठी खाजगी डॉक्टरांची महत्वाची भूमिका आणी जबाबदारी आहे.
तरी खाजगी डॉक्टरांना आरोग्य विभागाचे अधिकारी व नगरपालिका कर्मचारी याबाबत संपर्क करतील. त्यांना सर्वतोपरी सहकार्य व मदत करावी असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे
या प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी जे.व्ही.
कवळ देवी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील ,डॉ. सारिका भोळे, माया बोरसे, विक्रम राजपूत व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.