<
जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीटीआरआय, जळगाव आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय जळगाव यांचे सयुक्त विद्यमाने 28 ते 30 ऑक्टोबर, 2020 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने “पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात सहभागी होऊ ईच्छिणा-या उद्योजकांनी ऑनलाईन ॲप्लाय करावा. www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. किंवा प्लेस्टोअरमधून महास्वयंम ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. Employment या होम पेजवरील Employer वर क्लिक करुन, युझरआयडी व पासवर्डने साईनइन/लॉगईन करावे. आपल्या होमपेज वरील pandit Dindayal Upadhyay job Fair हा पर्याय निवडावा. त्यानंतर जळगाव जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करावे.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी Agree & post Vacancy या पर्यायावर क्लिक करावे. Add New Vacancy हा पर्याय निवडून भरावयाची रिक्तपदे, शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट दर्शवून नोंदवावी. या संधीचा जास्तीत जास्त उद्योजकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.