<
जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील युवक आणि युवतींसाठी दिनांक 26 ऑक्टोंबर, 2020 रोजी ऑनलाईन औद्योगिक क्षेत्रातील रोजगार व प्रशिक्षण संधी आणि आव्हाने या विषयावर मार्गदर्शन सत्राचे दुपारी 4.00 ते 5.00 या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर ऑनलाईन उपक्रमाची लिंक Google Meet ॲपवर शेड्युल केलेली आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.google.com/ufk-pace-ryp या लिंकवर जाऊन सत्रामध्ये सहभागी व्हावे. ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात अरुणजी बोरोले, उद्योजक तथा संचालक, एम-सेक्टर, औद्योगिक चॅरीटेबल ट्रस्ट, जळगाव उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहे. या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.