<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनामुळे सगळ्यात मोठा परिणाम शिक्षणक्षेत्रावर झाला आहे. अजूनही शाळा केव्हा सुरू होणार हे स्पष्ट होत नाही. विद्यार्थी आॕनलाईन पध्दतीने शिक्षण घेत आहेत परंतु शिक्षक व विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्गाचे व्हाट्सअप वर गृप आहेत पण त्यावर अभ्यास टाकल्यास वैयक्तिक रित्या न पोहचता सामूहिक विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचतो होमवर्क तपासणे, स्वतंत्र नोटस देणे याशिवाय मोबाईल स्टोअरेज फूल होणे या सर्व समस्या निर्माण होत आहेत. अध्ययन अध्यापन क्रिया योग्य पध्दतीने होत नाही. Youtube वर अभ्यासाचा व्हीडीओ पाहत असतांना त्याच्या खाली वेगवेगळे व्हीडीओ ओपन होतात, जे लहान मुलां-मुलींसाठी योग्य नाहीत. अभ्यास सोडून तेच व्हीडीओ मुलं पाहतात पालक इतका वेळ त्यांना देऊ शकत नाही. या सगळ्यांवर उपाय म्हणून इंटेलेक्ट टेक्नो साॕफ्ट प्रा.लि. जळगावचे संचालक अमित मनोरे यांच्या संकल्पनेतून ई विद्या अॕप हे विकसित केले आहे. सदर अॕप हे मोफत असून या सर्व अडचणी सोडवल्या आहेत. ई विद्या टिचर अॕप व ई विद्या स्टूडंट अॕप असे अॕपचे दोन भाग प्ले स्टोअर वर उपलब्ध आहेत. ई विद्या टिचर अॕप मधून शिक्षक आपले अध्यापनाचे विषयानुसार व्हीडीओ, आॕडीओ, नोट्स, होमवर्क, झूम मिटींग व गुगल मीट वर जे विद्यार्थी काही अडचणीमुळे जाॕईन होऊ शकले नाही असे व्हीडीओ सुध्दा वैयक्तिक विद्यार्थ्यांना पाठवू शकतात. युट्युबची लिंक जरी टाकली तरी त्याखालील इतर व्हीडीओ ओपन होत नाही. युट्युबवर जाण्याची आवश्यकता नाही. ई विद्या स्टूडंट अॕप मध्ये विद्यार्थ्यांने वैयक्तिक रित्या सर्व विषयांचे व्हीडीओ किती पाहिले, सोडवलेले होमवर्क,मिळालेले नोट्स, दिलेल्या परीक्षा हे विद्यार्थी व शिक्षक दोन्ही त्यांचा नावासह पाहू शकतात. शाळा जर हे अॕप वापरत असेल तर शाळेची स्वतंत्र वेबसाईडही तयार करून मिळते. त्यामुळे या अॕपचा महाराष्ट्रातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोठा उपयोग होणार आहे. या अॕपचा सर्वप्रथम उपयोग हा शहरातील प.न.लुंकड कन्याशाळेत सुरू झाला आहे. शाळेतील उपशिक्षक प्रवीण धनगर यांनी प्रोडक्ट मॕनेजर गौरव पाटील यांना अध्यापनात येणाऱ्या या सर्व अडचणी सांगितल्या त्यानुसार या सर्व अडाचणी दूर करून कन्याशाळेत मोफत वापरण्यास दिले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष सुशील अत्रे, चिटणीस अभिजित देशपांडे, सदस्य शरदचंद्र छापेकर, प्रेमचंद ओसवाल समन्वयिका पद्माजा अत्रे, रेवती शेंदुर्णीकर यांनी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थीनींच्या हितासाठी अॕप वापरण्याची परवानगी दिली. तसेच वेळोवेळी शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे, ज्येष्ठ शिक्षिका वंदना तायडे यांनी सहकार्य केले. ई विद्या अॕपचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते झाले असून जिल्ह्यातील सर्व शाळा या अॕपचा उपयोग करतील असे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. उद्घाटन प्रसंगी स्वाती नेवे, वंदना तायडे, प्रवीण धनगर, विजयसिंग पाटील, स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, हेमंत सोनार उपस्थित होते. तरी जिल्हातील जास्तीत जास्त शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी हे अॕप डाऊनलोड करावे. एक युजर नेम व पासवर्ड अॕप वापरण्या संदर्भात दिला जातो. त्यासाठी 7498974208 या नंबर वर संपर्क करावा.