<
जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) – उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव कार्यालयामार्फत दिपावली सणानिमित्त तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री परवाना दिला जाणार आहे. तात्पुरत्या फटका परवाना घेण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात खालील कागदपत्रे 9 नोव्हेंबर, 2020 पावेतो सादर करावीत. असे आवाहन प्रसाद मते, उपविभागीय अधिकारी, जळगाव यांनी केले आहे
अर्जदाराचा अर्ज व फोटो (अर्जात मोबाईल नंबर नमुद करावा) चलन, ज्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करावयाची आहे त्या जागेचा 7/12 उतारा किंवा सिटी सर्व्हे चा उतारा, ग्रामपंचायतीचा मिळकत उतारा, जागा मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायतीचे हद्दीत असल्यास ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला, नगरपालीका हद्दीत असल्यास नगरपालिकेचा अंतिम नाहरकत दाखला, महानगर पालीका हद्दीत असल्यास महानगर पालिका जळगाव यांचा अंतिम नाहरकत दाखला, ज्या जागेवर फटाके विक्री करावयाची आहे ती जागा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते त्या पोलीस स्टेशनचा नाहरकत दाखला, फटाके विक्री परवाना संबधीचे नियम, अटी व शर्तीचे पालन करीत असल्यासंबधीचे प्रतिज्ञापत्र, मागील वर्षाची तात्पुरता परवान्याची छायांकीत प्रत, तात्पुरता फटाका परवानाधारक यांचा अर्ज व यासह नमुद कागदपत्रे कार्यालयास सादर केल्यानंतरच चलन पास करुन परवाना दिला जाईल, याकरीता जळगाव व जामनेर तालुक्याच्या सर्व फटाका विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की, कोणीही विनापरवाना (बेकायदेशीर) फटाका विक्री केंद्र सुरु केल्यास त्यांचेवर कठोर दंडात्मक कारवाई करणेत येईल. असे श्री. मते, उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.