<
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांनदाच मोठ्या प्रमाणात पत्रकारांची एकसंघ ‘मोट’ बांधून पत्रकारांची ताकद उभी करणारे, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व अशा सर्वगुणाचं कौशल असणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच नुकतीच संघटनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेले नजरकैद वृत्तपत्राचे संपादक प्रविण सपकाळे यांचा आज वाढदिवस…
गेल्या चार पाच वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची धुरा संभाळल्यापासून तर आजतागायत पत्रकारांसाठी सतत कार्यरत राहून पत्रकारांसाठी नेहमीच काही नवीन करत नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवित असतात. पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या पाल्यांना तसेच शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात होत आहे असं पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पहिल्यांदा होत असल्याने संघटनेबाबत अनेकांनी कौतुकही केले आहेच. पत्रकारांसाठी हेल्मेट वाटप हा अतुलनीय उपक्रम तर आपण सर्वांनीच पहिला आहेच, पत्रकारांच्या कामगिरीचं कौतुक म्हणून पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे असं क्रियाशील व्यक्तिमत्व प्रविण सपकाळे यांच्या रूपानं जिल्ह्याला मिळाले आहे.
‘पत्रकारिता परमो धर्म’ हे ब्रीद वाक्य घेऊन सेवाव्रत असणाऱ्या प्रविण सपकाळे यांना संघटनेनं उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवून खऱ्या अर्थाने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. पत्रकारितेतील उत्तर महाराष्ट्रातील सक्षम नेतृत्व…
पत्रकारांच हित जोपासणारं कर्तृत्व…
पत्रकारांचा आधारस्तंभ…
पत्रकारांच्या सुख दुःखात साथ देणारं व्यक्तिमत्व… म्हणून प्रविण सपकाळे यांची ओळख आहेच… !
पत्रकार संघाचं काम खूप मोठं असल्यानं एवढा भार एकटा दुकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही… त्याला लागते ‘टीम वर्क’ अर्थातच सोबतच्या सहकाऱ्यांची मोलाची साथ… त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही अशी प्रामाणिक भावना प्रविण सपकाळे यांची आहे आणि ते व्यक्त होतांना आपण पाहिलेलं आहे. कुठलंही काम,कोणताही उपक्रम ‘मी’ केला असं साधं वाक्य सुद्धा तोंडून निघत नाही. ते सर्व श्रेय आपल्या ‘टीम’ अर्थात सहकाऱ्यांना देतात त्यामुळेच कदाचित त्यांच आणि त्यांच्याशी जुळलेल्या पत्रकार बांधवांच अनोखी नातं निर्माण झाल्याचं दिसत.
जिल्ह्यात संघटनेच्या सुरवातीच्या काळात संघटनेचा अजेंडा घेऊन, ध्येय धोरणे घेऊन किशोर रायसाकडा यांनी सुरवात केली.. एक एक जण जुळवतं गेले याच वेळी प्रविण सपकाळे यांची जोड मिळाली..प्रमोद सोनवणे,भूषण महाजन, भरत काळे, भगवान मराठे,नरेश बागडे, दीपक सपकाळे यासह अनेक हात संघटन वाढीसाठी झिजल्यानेच आज संघटना ‘जिल्ह्यातील पत्रकारांचा सर्वाधिक सभासद संख्या असणारा ‘नंबर एक’ पत्रकार संघ म्हणून ओळखलं जात आहे.
कोरोना काळातही संघटनेचे वरच्या फळीतील नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन गुगल मीट अँप, झूम अँप द्वारे बैठका घेऊन संवाद साधला.पत्रकारितेत होत असलेल्या आमूलाग्र बदलाबाबत चर्चा घडवून व त्यावर मार्ग काढले, पत्रकारांची विचारपूस केली. तर संघटनेचे खंबीर नेतृत्व असलेले राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी पुण्यात पत्रकारांसाठी कोविड सेंटर उभारलं… त्याचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करून पत्रकारांच्या सेवेत राज्यातील पाहिलं आणि शेवटचं असं एकमेव पत्रकांसाठीच कोविड सेंटर उभारलं.. ही सामाजिक दृष्टी फक्त महाराट्र राज्य पत्रकार संघाचं नेतृत्व करणारे संजयजी भोकरे यांच्याच कडे असल्याची प्रचिती अख्या महाराष्ट्रातील पत्रकारांना आली.
विश्वासरावांनी पत्रकारांचा विश्वास संपादित करत पत्रकारांची मोट बांधली आहे. राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी तडागाळतील पत्रकारांना एकत्र आणून संघटना वाढवून आपली एक ओळख निर्माण केली आहे. राज्यभर पत्रकारांची सर्वात मोठं संघटन असणारी एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ होय. संघटनेच्या उभारणीसाठी हातभार लावणाऱ्या(सर्वांचे नाव घेणेशक्य नसल्याने ) तमाम ज्ञात अज्ञात पत्रकार बांधवाना मानाचा मुजरा…
तसेच जळगाव जिल्ह्यात पत्रकार संघाची नव्याने जबाबदारी स्वीकारणारे लोकमतचे अमळनेर पत्रकार डिगंबर महाले, पुण्यप्रताचे संपादकीय प्रमुख प्रदीप गायके, पत्रकार मिलिंद लोखंडे, फैजपूर दिव्यमराठीचे पत्रकार नंदकुमार अग्रवाल यांची ताकद मिळाल्याने संघटना अजून अश्वगतीने पत्रकार हितासाठी काम करेल असा विश्वास आहेच.
प्रविणभाऊ सपकाळे सारख्या लाडक्या नेतृत्वास पुनःच्छ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… !