<
जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे
तालुक्यात डेंग्यु सदृस्य रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे खाजगी डॉक्टरांच्या अहवालातुन दिसून आल्याने आरोग्य विभागाच्या वतीने साप्ताहिक डेंग्यु सर्वेक्षणा चा कार्यक्रम आखण्यात आला .सदर कार्यक्रमाअंतर्गत फत्तेपुर येथे डेंग्यु सर्वेक्षण करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणा मध्ये 1228 घरे तपासण्यात आले यामध्ये 7530 लोकसंख्या पुर्ण करण्यात आली. यामध्ये 91 कंनटेनर मध्ये डास अळ्या आढळून आल्या पैकी 67 कंटेनर खाली 24 कंटेनर मध्ये एबेट टाकण्यात आले. ग्रामपंचायतीला गटारी वाहत्या करणे, डबके बुजणे किंवा त्यावर ऑईल फावरणे व कोरडा दिवस पालळ्याबाबत पत्र देण्यात आले. सर्वेक्षणा चे पर्यवेक्षण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत,डॉ. योगेश राजपूत, तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच.माळी यांच्याकडून करण्यात आले. भागवत वानखेडे, सुनील पाटील,पुरुषोत्तम वाणी,गजानन माळी, कविता वाहुळे,किशोर शहाणे, पुजा चौधरी, सिंधू पेटकर यांच्याकडून सर्वेक्षण करण्यात आले. नागरिकांनी फुल कपडे वापरणे,डास विरोधी द्रव्याचा,मच्छर विरोधी अगरबत्ती,मलमे मच्छरदाणी चा इ. चा वापर करावा व घरातील सर्व भांडी झाकून ठेवावी आढवड्यातून एक दिवस सर्व भांडी खाली करून कोरडी करून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले.