<
अमळनेर(प्रतिनिधी)- पत्रकारांना विमा कवच , कोरोना काळात मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी राज्य स्तरावर प्रयत्न सुरू आहे, त्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहून संघटन बळकट करून पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे मनोगत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी अमळनेर येथे दिवाळी पूर्वी झालेल्या पत्रकार बांधवांच्या स्नेहमेळाव्यात व्यक्त केले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झालेले डिगंबर महाले यांची लायन्स क्लबच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने एका शिक्षक आणि पत्रकाराला लायन्स क्लबचे अध्यक्ष पद पहिल्यांदाच मिळाल्याच्या निमित्ताने पत्रकार मित्रांचा एक स्नेह मेळावा आयोजित केला होता. त्यात प्रविण सपकाळे अध्यक्षीय भाषणात बोलत होते स्थानिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेह मेळाव्याला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्राचे आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख मिलिंद लोखंडे ,जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदिप गायके, जिल्हा संघटक भगवान मराठे ,ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दिपक सपकाळे , जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोळे व संजय तांबे , सहसंघटक चेतन निंबोळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाभरातून आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके,जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील या मान्यवर मंडळींसह स्थानिक पत्रकार प्रा हिरालाल पाटील, शामकांत पाटील या बांधवांनीही मनोगतातून डिगंबर महाले यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय संघटक संभाजी देवरे , जिल्हा उपाध्यक्ष दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष विजय पाटील,लोकमतचे उपसंपादक रवींद्र मोरे,तालुका प्रतिनिधी संजय पाटील, सामनाचे जितेंद्र पाटील,आजलगचे संपादक गौतम बिऱ्हाडे, दिव्य मराठीचे चंद्रकांत पाटील, भटू वाणी,जनवास्तवचे संपादक चेतन राजपूत, किरण पाटील,खबरीलालचे मुख्य संपादक जितेंद्र ठाकूर, एएम न्यूजचे ब्युरो चीफ कुंदन खैरनार,देशोन्नतीचे प्रा विजय गाढे, जयवंत वानखेडे,महाराष्ट्र टाईम्सचे मिलिंद पाटील,दिव्य लोकतंत्रचे संपादक समाधान मैराळे,सकाळचे प्रा हिरालाल पाटील, शामकांत पाटील,देशदूतचे बाबूलाल पाटील, अमळनेर२४×७चे संपादक डॉ विलास पाटील,शशिकांत पाटील,तरुण भारतचे काशिनाथ चौधरी, मर्डरचे सुखदेव ठाकूर, लेखनमंचचे संपादक अजय भामरे,गावकरीचे भुपेंद्र पाटील,जनशक्तीचे सचिन चव्हाण,खान्देश व्हिजनचे संपादक संजय मर्साळे ,नवभारतचे मुन्ना शेख,बातमीदारचे गौरवकुमार पाटील, आबीद शेख,पूर्व खान्देशचे विवेक अहिरराव , अमळनेर हेडलाईनचे रोहित बठेजा, विश्ववेधचे डॉ युवराज पाटील आदींसह शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, यावेळी स्नेहमेळाव्याचे आयोजक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष डिगंबर महाले यांनी सत्कार पर मनोगतात सांगितले की माझे छोटेखानी यजमानत्व गोड करून घेतले. मला सन्मानित केले त्यामुळे भावी काळात सर्वच क्षेत्रात कार्य करण्यासाठी मला नवऊर्जा मिळाली आहे,पत्रकार संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पत्रकारांसाठी भरीव कार्य करण्याचे आश्वस्त केले. ह्या स्नेह मेळाव्याचा दिवस अविस्मरणीय व प्रेरणादायी केल्याबद्दल उपस्थित सर्वांचा मी मनस्वी ऋणी आहे. या शब्दात डिगंबर महाले यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन लोकशाहीचे आर जे पाटील यांनी केले,शेवटी स्नेहमेळावा होऊन सुरुची भोजनाचा आनंद सगळ्यांनी घेतला.