Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाफेडच्या मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्रासाठी;इच्छूक संस्थांनी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव. दि. 14- जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी नाफेडमार्फत शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी इच्छूक संस्थांनी आपले अर्ज 20 ऑगस्ट, 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, देखरेख संघाची इमारत, युनिटी चेंबर्स, गणेश कॉलनी, जळगाव या कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत.

            इच्छूक संस्थांनी केंद्र मागणीसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी पुढील अटी व शर्तींची नोंद घ्यावी. जिल्हा अथवा तालुकास्तरावरील अ वर्ग सभासद असलेले खरेदी  विक्री संघ, पणन व प्रक्रीया सहकारी अ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी वरील दोन्ही अ वर्ग सभासद संस्था कार्यरत नाहीत त्याठिकाणी इतर सहकारी संस्थेस ब वर्ग सभासद करून घेवून खरेदीचे काम देणे, खाजगी बाजार समिती असा प्राधान्यक्रम राहील.

     खरेदी करणाऱ्या संस्थेकडे साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचा दाखला आवश्यक आहे. मॉयश्चर मिटर, चाळणी, ताडपत्री, संगणक, संगणक चालवण्याची   क्षमता असलेला जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, संगणक हाताळणेकरिता प्रशिक्षित असलेला सेवकवर्ग व इलेक्टॉनिक वजनकाटा असणे आवश्यक आहे.

        वखार महामंडळाच्या गोदामात साठवणूकीपुर्वी संस्थेचे स्वत:चे अथवा भाड्याचे गोदाम असावे. अन्नधान्य अथवा कडधान्य व तेलबिया इत्यादि खरेदी विक्रीचा किमान 1 वर्षाचा अनुभव असावा, खरेदी केंद्र चालविण्याकरीता आवश्यक कर्मचारी असावे काळ्या यादीत किंवा अपहार किंवा फौजदारी गुन्हा अशा प्रकारची करवाई झालेली नसावी. मागील तीन वर्षाचे सनदी लेखापाल अथवा शासकीय लेखापरिक्षक यांनी साक्षांकित केलेले ताळेबंद पत्रके संस्थांनी सादर करावीत, पॅनकार्डची प्रत, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेकडे 10 लाख खेळते भांडवल असल्याचे बँकेचे प्रमाणपत्र अथवा बँक पासबुकची नोंद असावी. अशाप्रकारे अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या संस्थांनी केंद्र नोंदणीसाठी 20 ऑगस्ट, 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा मार्केटिंग कार्यालय, जळगाव या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ग्राहकांनी वस्तु खरेदी करतांना पावती घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

अल्पसंख्याक समाजातील तरुणांना सुवर्णसंधी

Next Post
अल्पसंख्याक समाजातील तरुणांना सुवर्णसंधी

अल्पसंख्याक समाजातील तरुणांना सुवर्णसंधी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d