<
महाराष्ट्रातील विद्यार्थी भीक मागून उच्च व तंत्र शिक्षण विभागाची शासकीय तिजोरी भरण्याचा आगळा वेगळा उपक्रम महाराष्ट्र भर राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांचा व्यथा समस्या अडचणी आणि तक्रारी वेळोवेळी श्री. उदय सामंत मा. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे सादर केलेल्या आहेत.
कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावामुळे प्रथम व द्वितीय वर्षाचा परीक्षा न घेता विध्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आले होते या धर्तीवर बैठकीमध्ये “विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने वसूल केलेली प्रथम व द्वितीय वर्षाचे परीक्षा शुल्क सरसकट परत करावे किंवा पुढच्या परीक्षांमध्ये समायोजित करावी आणि शैक्षणिक वर्ष २०-२१ साठी प्रवेश शुल्कामध्ये सूट म्हणून फक्त शिकवणी शुल्कासाठी सुलभ हप्ते प्रदान करण्याचे आणि विकास शुल्क जवळपास ४०% पर्यंत आकारावे आणि याव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही” याबाबत सर्वानुमते विचारविनिमय होऊन श्री.जे.पी. डांगे यांच्यावर अहवाल तयार करण्याची जबाबदारी आपण सोपविली होती यानंतर १५ दिवस उलटून सुद्धा कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती हि बाब आम्ही मंत्री महोदयांना दि.०५/१०/२०२० च्या प्रत्यक्ष भेटीत निदर्शनास आणून दिली होती परंतु आजतागायत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून कोणतेही शासकीय आदेश या संदर्भात अजूनही जरी केलेले नाहीत. आम्ही गेले दोन महिने यासंदर्भात त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत आहोत.यावरून असे स्पष्ट होते कि महाराष्ट्र राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग काही अडचणी मध्ये असू शकतो किंवा आमचा असा निकष आहे कि या विभागाला निधीची अतिशय आवश्यकता आहे. म्हणून विध्यार्थीन चा फीस संदर्भात निर्णय घ्यायला जड जात आहे. ह्या आंदोलना चा शेवटी उदयन सामंत यांनी मासु चा संथापक अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे व पदाधिकाऱ्यांना भेट दिली व या बैठकीमध्ये फी रेगुलेटिंग ऑथॉरिटी यांनी बनवलेल्या अहवालामधे त्रुटी असल्यामुळे शासकीय निर्णय घेता आला नाही परंतु दिवाळी नंतर यावर अंतिम बैठक घेऊन ह्या सगळ्या त्रुटी दूर करुन विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाईल असे सकारात्मक आश्वासन यावेळी मान.मंत्री महोदय श्री. उदय सामंत यांनी दिले परंतु यानंतर देखील शासकीय निर्णय जारी करायला उशीर झाला तर आम्ही ही लढाई कायदेशीर मार्गाने लढू असा इशारा ऍड.इंगळे यांनी दिला.ह्या वेळी जळगाव मध्ये हि मासु चे पदाधिकर्यांनी हा उपक्रम राबवत आकाशवाणी चौकात भीक मागो उपक्रम रावबविला ह्या उपक्रमाला जळगाव करांनी चांगला प्रतिसाद दिला ह्या केली भीक मागून जे काही पैसे जमा झाले आहेत. ते उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा बँक खात्यात डीडी द्वारे पाठवण्यात येणार आहे. सोबत जिल्हा अधिकाऱ्यांना हि निवेदन देण्यात आले ह्या वेळी मासु चे विभाग प्रमुख अँड.अभिजित रंधे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम जळगाव विभागात पार पडला त्या वेळी उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सह सचिव दिपक सपकाळे,
जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन जिल्हा सचिव रोहित काळे हे उपस्थित होते
मासूच्या औरंगाबाद,बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, हिंगोली आणि रत्नागिरी या सर्व जिल्ह्यातील सहकाऱ्यांनी याउपक्रमाद्वारे निधी गोळा करुन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला गेला.