<
जळगाव, दिनांक 14 – जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरिता पोलिस शिपाई भरती पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2019-2020 अतंर्गत उमेदवारांची निवड करणेसाठी शारिरीक पात्रता चाचणी व कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम दिनांक 19 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पोलिस अधिक्षक कार्यालयाजवळील पोलिस परेड ग्राऊंड, जळगाव येथे घेण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांनी वेळेवर उपस्थित रहावे.
प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 2.50 लाख पेक्षा जास्त नसल्याबाबतचे संबंधित तहसिलदार यांचा दाखला (सन2018-2019). उमेदवार अल्पसंख्यांक (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन) समाजातील असलेबाबत कागदोपत्री पुरावा. उमेदवार 18 ते 25 या वयोगटाबाबत जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला. उमेदवारांची उंची पुरुष 165 सेमी व महिला 155 सेमी, छाती पुरुष 79 सेमी असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असलेबाबतचे गुणपत्रक. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातंर्गत नाव नोंदणी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बौध्दांसाठी जातींचा दाखला इत्यादी कागदपत्रांची सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारीरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा, असे आवाहन वामन कदम, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे