<
नांद्रा/पाचोरा(प्रतिनिधी)- येथील न्यु इंग्लिश स्कुल नांद्रा व आत्ताचे आप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. एस. एस. सी.सन १९९१-९२ च्या माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मिलनाचा कार्यक्रम महेश गवादे नांद्रा, नगराज पाटील कुरंगी, कैलास पाटील आसनखेडा यांनी घडवून आणला. सुरुवातीला त्यांनी वर्ग मित्र नावाचा सोशल मिडीयावर व्हॉट्सअप गृप बनवून नोकरी व कामधंद्यानिमित्त बाहेर गावी गेलेल्या मित्रांना व्हाट्सएपच्या माध्यमातून एकत्रीत करून वर्ग मित्र आणि मैत्रिणींची भेट घडून आणली. तब्बल २८ वर्षा नंतर वर्ग मित्र- मैत्रिणी एकमेकांना प्रत्यक्ष भेटत असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळत होतो. कुणाच्या डोळ्यात अश्रू तर कुणाच्या डोळ्यात हसु असे वातावरण निर्माण झाले होते. या अनुभवाचे साक्षीदार म्हणून त्यावेळी शिकवणारे गुरुजन उपस्थितीत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होऊन महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व कै.गजानन गरुड यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. नंतर दिवंगत गुरुजांना व दिवंगत वर्ग मित्रांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक एस.पी.तावडे यांचा वर्ग मैत्रिणींनी, आर.पी.पाटील कुरंगी, के.आर.चौधरी पहान, हडसन, वडगाव, आर.यु. पाटील आसनखेडा, नांद्रा येथील वर्ग मित्रांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाची ओळख व रूपरेषा महेश गवादे यांनी सांगीतली. या प्रसंगी सर्व वर्ग मित्रांनी आप-आपले अनुभव व वर्गातील गंमती जमती सांगून वातावरण प्रसन्न केले.उपस्थित गुरुजनांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन गुरू-शिष्य नाते कसे बदलत आहे यावर प्रकाश टाकला या प्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षक भावूक झाले. गुरुजनांच्या व वर्ग मित्रांच्या हस्ते शाळेला सहा डिजिटल ग्रीन बोर्ड भेट देण्यात आले. वर्ग मित्रांच्या विधवा पत्नीचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. भविष्यात कोणत्याही वर्ग मित्रावर अथवा त्याच्या परिवारावर संकट आले तर त्याला सर्वांनी मदत करण्याचे ठरवण्यात आले. सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाला जामनेर येथील आर.के.हॉस्पिटलचे डॉ. आर.के.पाटील, डॉ. सुर्यकांत पाटील, डॉ.भास्कर पाटील, प्रमोद पाटी(प्रा.शि.अमळनेर), गणेश पाटील, माधवराव मिस्त्री, प्रमोद महाजन, ललीत महाजन, भाऊसाहेब पाटील, भरतसिंह राजपुत, रविंद्र पाटील, अनिल बोरसे, शालीक मिस्त्री, जगन्नाथ पाटील, गौतम बागुल, भगवान भोई, विजय पाटील,प्रमोद पाटील(जामनेर) निंबा सूर्यवंशी, विनायक पाटील, वैशाली चौधरी, भारती पाटील, कल्पना पाटील, निंबाबाई सूर्यवंशी, आशा दुसाने, अरुणा पाटील, विजया पाटील, अश्विनी पाटील इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ठाकूर तर आभार नगराज पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.एस,चौधरी, रामभाऊ पाटील, बंडू सोनार महेश गवादे यांनी परिश्रम घेतले.