<
पाळधी/धरणगाव(प्रतिनिधी)- येथे दिवाळी भाऊबीज निमित्ताने पाळधी शहरातील ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, मिठाई बॉक्स महिला कर्मचाऱ्यांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान सोहळा अखिल भारतीय जिवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे धरणगाव तालुकाध्यक्ष गोपाळराव सोनवणे यांनी आयोजित केला होता. कोरोना कालखंडात पाळधी शहरातील आरोग्य प्रशासनासोबत जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी फवारणी, परिसर सील करणे, गावात स्वच्छता राखणे अशी जबाबदारी कर्तव्यात कसूर न करता पूर्ण केल्याने ते सन्मानास पात्र ठरले. यावेळी पाळधी शहरातील आशा वर्कर यांना रुग्ण कल्याण समिती सदस्य दिपकराव सावळे यांनी. ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला वर्ल्ड व्हिजन संस्थेने सर्वांना मास्क वाटप केला. व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह धरणगाव पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पाळधी बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, पाळधी खुर्द चे सरपंच चंदू माळी, उपसरपंच अनिल कासट, श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र कासट, उद्योगपती दिलीप पाटील, माजी सभापती राजू पाटील, डेप्युटी सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य धर्मेन्द्र कुंभार, किशोर सोनवणे अखिल भारतीय जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगार, किरण नांद्रे, जिल्हा संघटक भगवान मराठे, भूषण महाजन, अलीम देशमुख, दीपक झंवर, एपीआय हनुमंतराव गायकवाड यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या गौरवाने ग्रामपंचायत कर्मचारी व अशा वर्कर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा सेनेचे शिवाजी पाटील, मुकेश भोई, दीपक श्रीखंडे, हिम्मत कुंभार, सुभाष कापुरे संतोष सोनवणे, पिंटू कोळी गोकुळ पाटील, बबलू पाटील, सादिक देशमुख, महेंद्र चौधरी, असलम मण्यार, महेश मोरे, शामकांत फुलपगार, नितीन फुलपगार यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आधार गुरुजी पाटील यांनी केले.