<
जळगाव – (प्रतिनिधी) – राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री श्रीमती ना. येशोमतीताई ठाकूर यांनी जळगाव येथील धनाजी नाना विद्याप्रबोधिनी जळगाव येथे सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आ. शिरिषदादा चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले व धनाजी नाना विद्याप्रबोधिनी या संस्थेने 25 वर्ष पूर्ण करून नुकताच रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. धनाजी नाना विद्याप्रबोधिनी संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास मंत्री श्रीमती ना. येशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते मानपत्र देऊन आ. शिरिषदादा चौधरी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सदर मानपत्राचे वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे यांनी केले. सदर प्रसंगी गोदावरी फौउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदिपभैया पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डी.जी.पाटील, प्रभाकरआप्पा सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाय.जी.महाजन, तसेच संस्थेचे पदाधिकारी, व लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद होते.