<
जामनेर(प्रतिनिधी)- क्षत्रिय माळी समाज संघटना पहुर कसबे ता.जामनेर यांच्या तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत जामनेर तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत खुला गटातून उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांनी यश मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालय पहुर कसबे येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संदिप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. क्षत्रिय माळी समाज संघटनेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाल गट, किशोर गट व खुला गट अशा तीन गटात तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली यात खुला गटासाठी कोरोना नंतरचे जग, भ्रष्टाचार एक भीषण समस्या व शेती आणि आजची आर्थिक अर्थव्यवस्था हे तीन विषय निबंध लेखन स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते यात संदिप पाटील यांनी कोरोना नंतरचे जग याविषयावर निबंध लेखन केले व या निबंधास तृतीय क्रमांक मिळाला. संदिप पाटील यांनी यापूर्वी देखील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे तसेच त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे, या यशाबद्दल संदिप पाटील यांचे शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.