<
चाळीसगाव-(प्रतिनिधी) – 3 डिसेंबर हा दिव्यांग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. समावेशित शिक्षण विभाग,पंचायत समिती चाळीसगाव च्या वतीने 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर असा दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये करण्यात आले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष सौ प्रतिभा ताई मंगेश चव्हाण व स्वयंदिप संस्थेचे अध्यक्ष मीनाक्षीताई निकम यांच्या हस्ते दिव्यांग शिक्षक श्री चित्ते सर यांना फॉर्म देऊन करण्यात आले.
रक्तदान शिबिराच्या उडघटणाच्या वेळी हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समयी जिल्हा परिषद समावेशित शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक श्री दत्तू पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “थॅलेसेमिया विद्यार्थ्यांना रक्ताची खूप मोठी गरज लागत असून,लॉकडाऊन काळामध्ये या विद्यार्थ्यांना रक्त मिळवण्यास अडचणी निर्माण झाल्या. गेल्या सहा महिन्यापासून थॅलेसेमिया विद्यार्थ्यांना रक्त मिळण्यासाठीच्या अडचणी दूर करण्यासाठी थॅलेसेमिया मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करत आहोत त्यातलाच हा एक भाग आहे.” त्यासोबतच मीनाक्षीताई निकम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की , “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत समाज सध्या सकारात्मक विचार करत असून हि खूप आनंदाची बाब आहे.” या उदघाटन सोहळ्या प्रसंगी मंचावर शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ प्रतिभा मंगेश चव्हाण,स्वयंदिप संस्थेच्या मीनाक्षीताई निकम, गटशिक्षणाधिकारी श्री विलास भोई,विस्तार अधिकारी श्री जितेंद्र महाजन, पंचायत समितीचे ओ एस श्री गांगुर्डे, श्री मालाजंगम सर,जिल्हा परिषदेचे समनव्यक दत्तू पाटील,डाएटच्या समन्वयक सौ सुषमा इंगळे या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज रणदिवे यांनी केले.
त्यानंतर प्रत्यक्ष रक्तदान करायला सुरुवात झाली. रक्तदान करणार्यांमध्ये शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. त्यासोबतच पंचायत समितीतील कर्मचारी,शिक्षण विभागातील कर्मचारी यांनीही मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. पंचायत समिती सदस्य श्री सुभाष पाटील यांनीही रक्तदान केले,त्यासोबतच स्वतः दिव्यांग असणारे श्री शंकर चौधरी यांनी व श्री चित्ते सर यांनी उस्फूर्तपणे स्वतःहून रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जीवन सुरभी ब्लड बँक चे डॉक्टर भदाणे, श्री हरीश बारगन,प्रियंका जगताप यांनी मेहनत घेतली. सोबतच चाळीसगाव तालुक्यात रक्तदानाचा महासंकल्प राबवणारे श्री पंकज पाटील व भूषण गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिराला पंचायत समितीचे सभापती श्री अजय पाटील,गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अजितसिंग पवार तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य यांनी भेट देऊन सदिच्छा दिल्या.या रक्तदान शिबिराचे आयोजन शिक्षण विभागातील पंकज रणदिवे, शाम नेरकर, प्रशांत पाटील,रवींद्र पाटील, वीरेंद्र पाटील, प्रशांत लांबट व सुमन पाटील यांनी केले.